vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

उत्तर-पूर्वे हा भाग ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ चा ‘कोहिनूर’ – पीयुष गोयल, केंद्रीय मंत्री

उत्तर-पूर्वे हा भाग ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ चा ‘कोहिनूर’ – पीयुष गोयल, केंद्रीय मंत्री

 

( सुरेश गायकवाड) प्रतिनिधी

मुंबई- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि ‘स्टुडंट्स एक्सपीरियन्स इन इंटर-स्टेट लिव्हिंग’ (SEIL) या उपक्रमाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकात्मता यात्रा २०२५ नागरिक अभिनंदन समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा दिक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात पार पडला. या समारंभाला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळेस त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

  यावेळेस गोयल यांनी सांगितले की, उत्तर-पूर्व भारत हा देशाचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद केले, परंतु अनेकांना या भागाचे महत्त्व अजूनही पुरेसे माहीत नाही. विद्यार्थ्यांमधील संवाद आणि देवाणघेवाण वाढल्यास देशाच्या विकासाला चालना मिळेल, असे सांगून सरकारने उत्तर-पूर्वेच्या वेगवान विकासासाठी बजेटच्या १०% निधीचे वाटप केले आहे. तसेच, भारत ‘विकसित भारत’ होण्यासाठी उत्तर-पूर्वेचा विकास अनिवार्य असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

   यापुढे त्यांनी असेही सांगितले की, रेल्वे, महामार्ग आणि पूल यांसारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे या प्रदेशाचा झपाट्याने कायापालट होत आहे. आसाम, त्रिपुरा, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर यांच्यात बंधुत्वाचा दृढ संबंध आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत उत्तर-पूर्व भारताला ६५ पेक्षा जास्त वेळा भेट दिली आहे. प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा तरी उत्तर-पूर्व भारताला भेट देऊन त्याचे सौंदर्य आणि संस्कृती अनुभवावी, असे आवाहन त्यांनी केले.

  या वर्षीच्या राष्ट्रीय एकात्मता यात्रेत २५६ विद्यार्थी सहभागी झाले असून, ते देशभरातील ३२ ठिकाणी प्रवास करत आहेत. ही यात्रा २३ जानेवारीला सुरू झाली असून, १३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमाचा उद्देश सांस्कृतिक देवाणघेवाण, राष्ट्रीय एकात्मता आणि विविध प्रांतांच्या परंपरा, रीतीरिवाज, भाषा व वेशभूषा यांचे सखोल आकलन वाढवणे हा आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून, उत्तर-पूर्व भारतातील ३० प्रतिनिधींनी मुंबईला भेट दिली. त्यांनी येथे संवाद सत्रांमध्ये आणि सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. हा उपक्रम सांस्कृतिक अंतर कमी करण्यासाठी, परस्पर समज आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पसरवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.

     या कार्यक्रमाला ABVP चे राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान, मफतलाल ग्रुपचे अध्यक्ष विशद मफतलाल, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आर. डी. कुलकर्णी उपस्थित होते. तसेच, देशभरातील अनेक मान्यवर, विद्यार्थी नेते आणि ABVP सदस्यांनी उपस्थिती दर्शवली.

संबंधित पोस्ट

सोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे! ‘इथिकल लीडरशीप’च्या कार्याची दखल

देहर्जे प्रकल्पबाधितांना भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी मलवाडा पॅटर्न तयार करा – मंत्री गणेश नाईक

श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातूनआतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी– ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

vishwatmaklokswamivarta

भारताने जगाला दिलेले आरोग्याचे अनमोल वरदान म्हणजे योग – केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या वतीने ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे योगाभ्यास कार्यक्रम

घाटकोपर भीमनगर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत बुद्धपौर्णिमा महोत्सव*बुद्धमूर्तीचा स्थापना सोहळा* 

पेट्रोल -डिझेल च्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरविल्या जात मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ