vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लोणार सरोवराच्या विकासकामांना गती द्या !पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश मंत्रालयात अधिकाऱ्यांची घेतली बैठक

लोणार सरोवराच्या विकासकामांना गती द्या !पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश मंत्रालयात अधिकाऱ्यांची घेतली बैठक

 

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या परिसरात जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित झाले पाहिजे. यासाठी विकास कामांना गती देण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन, आणि विकास आराखड्यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिलेत. यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटील, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, तसेच दूरदृष्यप्रणाली वरून बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड, अर्कीयॅालॉजी विभागाचे अरुण मलिक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर बघण्यासाठी सामान्य पर्यटकांसह संशोधन करणारे पर्यटकही जगभरातून मोठ्या प्रमाणावर येतात. संशोधनासाठी नासाचे शास्त्रज्ञ ही बराच वेळा येथे येत असतात. त्यामुळे योग्य सुविधा त्या ठिकाणी देण्यासाठी सुरू असलेल्या विकास कामांना गती देण्याचे निर्देश मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिले. पर्यटन विभागाकडून दिला जाणारा विकास निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पर्यटक लोणार सरोवराकडे आकर्षित व्हावे यासाठी त्या ठिकाणी तारांगण, संग्रहालय, चिल्ड्रन पार्क, गार्डन एमटीडीसीचे रेस्ट हाऊसचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना मंत्री श्री.देसाई यांनी यावेळी दिल्या. तसेच या ठिकाणी पर्यटकांना सोयीचे व्हावे म्हणून रोपवेची सुविधा करता येईल का या संदर्भात संबंधित विभागांशी चर्चा करून काम सुरू करण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिल्या. तसेच इतर काही अडचणी असतील तर त्या स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सोडवण्याचे निर्देशही श्री.देसाई यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांच्याशी फोनवरून चर्चा करून विकासकामांना गती देण्याच्या सूचना केल्या. 00000000

संबंधित पोस्ट

बारावी परीक्षेची ऑनलाईन आवेदन पत्रे भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; विद्यार्थ्यांना शासनाचा दिलासा

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीचे ९ मे रोजी आयोजन

सौदी अरेबियात मदिनाजवळ झालेल्या रस्ते अपघातात अनेकजणांचा मृत्यू, मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भारतीय नागरिकही असल्याची भीती व्यक्त.,परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मदीना, सौदी अरेबिया येथे झालेल्या भारतीय नागरिकांच्या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत प्रभावितांना पूर्ण सहकार्य करण्याचे म्हणाले

vishwatmaklokswamivarta

परिसराबरोबरच वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- एनएसएस युनिटच्यावतीने “स्वच्छता ही सेवा” अभियान

vishwatmaklokswamivarta

घरोघरीच्या व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची छायाचित्रे अपलोड करण्यास शासनाच्या वतीने पोर्टलची निर्मिती-आपल्या बाप्पांचे फोटो अपलोड करण्याचे व दर्शन करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन