vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शांत मनाने परीक्षा द्या,बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून शुभेच्छा

आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शांत मनाने परीक्षा द्या,बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई, प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा उद्या दिनांक ११ फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत. यानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मंत्री श्री. भुसे म्हणतात, प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपल्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता बारावीची परीक्षा. ११ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी राज्यभरातील १५,०५,०३७ विद्यार्थी ३,३७३ केंद्रांवर परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

आपले कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या कसोटीचा हा क्षण आहे. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शांत मनाने, नीट तयारी करून आत्मविश्वासाने परीक्षा द्या. परीक्षा म्हणजे केवळ गुण मिळवण्याची स्पर्धा नाही, तर आपली ज्ञानपातळी तपासण्याची संधी आहे.

शासन, प्रशासन, पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणताही तणाव न घेता, सर्वतोपरी प्रयत्न करून उत्तम कामगिरी करा.

संबंधित पोस्ट

केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्राचे ‘स्टेट मन्युफॅक्चरिंग मिशन’ सुरू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’चे पुणे येथे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद प्रश्नोत्तर :एच. आर. महाविद्यालयातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी व्यवहारिक मराठीचे धडे घ्यावे; १५ ऑगस्टनंतर मुदतवाढ नाही — मंत्री प्रताप सरनाईक

भिवंडीत ‘मिथेनॉल’चा मोठा साठा जप्त; आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएची धडक कारवाई

अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी जलद कार्यवाही करावी ! मंत्री आदिती तटकरे

वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना- वनमंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta