vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

परीक्षा केंद्राला जिल्हाधिकारी यांची अचानक भेट दहावी व बारावी परीक्षामधील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

परीक्षा केंद्राला जिल्हाधिकारी यांची अचानक भेट दहावी व बारावी परीक्षामधील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

रायगड प्रतिनिध

 जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष किशन जावळे यांनी अलिबाग शहरातील बारावीच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.जिल्ह्यातील परीक्षांचे संचलन सुयोग्य व परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची स्थापन करण्यात आली आहे. राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षामधील गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाची देखील प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.जिल्ह्यात परीक्षा काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आले आहे.

इंग्लिश विषयाची परीक्षा सुरू असताना जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी जनरल अरुण कुमार वैद्य महाविद्यालय येथील केंद्राला अचानक भेट दिली. त्यांनी तेथील सुरक्षा व्यवस्थेची व परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.

 परीक्षेतील गैरप्रकारांना सहकार्य करणाऱ्यांविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देश श्री जावळे यांनी केंद्र प्रमुखांना यावेळी दिले. कॉपीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा येत असल्याने असे प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यावर्षी कठोर उपाय केले आहेत. येत्या काळात प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अचानकपणे जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेट देणार असून तेथे गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचेही श्री जावळे यांनी सांगितले.

बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण 50 परीक्षा केंद्र असून 31 हजार 857 विद्यार्थी बसले आहेत.

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरातून लाखो नागरिकांना दिलासा महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी शासन कटिबद्ध- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

जुना बायपास मार्गावर हलक्या व जड मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी: पोलीस प्रशासनाची अंतिम अधिसूचना जारी

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात १८ हजार २७६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,- मराठा समाजाच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक, उपोषण मागे घेण्याचे आवाहन- प्राप्त अर्जांपैकी ९९.९ टक्के अर्ज मंजूर; एकही अर्ज प्रलंबित नाही- महसूल मंडळनिहाय विशेष शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन- अंतरवाली सराटीच्या विकासावर लक्ष देणार

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस,राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा होणार- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थ्यांशी संवाद-गावागावातील लाभार्थ्यांचा उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद.महिला लाभार्थ्यांचा थेट शिवारातून उपक्रमात सहभागविभागीय आयुक्तांकडून अडचणी सोडविण्याबाबत महिलांना आश्वासन500 वर बचत गटातील 6 हजार महिला सहभागी…

नमुंमपा सरळसेवा पदभरती परीक्षेच्या पहिल्या दिवशी 6 जिल्हयातील 13 केंद्रांवर परीक्षा प्रक्रीया सुव्यस्थित संपन्न