vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम;वृक्ष उत्पादक व खरेदीदार मेळाव्यात ४४९ जणांचा सहभाग

सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम;वृक्ष उत्पादक व खरेदीदार मेळाव्यात ४४९ जणांचा सहभाग

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने मंगळवारी (दि.१२) संत एकनाथ रंगमंदीर येथे वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात ४४९ जणांनी सहभाग घेतला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. वृक्ष लागवडीला चालना देऊन शेतकऱ्यांना त्याद्वारे उत्पन्न मिळावे हा हेतू या मागे होता. तथापि, वृक्ष लागवड होऊन पर्यावरणाचे संवर्धन होणे हा मुख्य हेतू होता.

वृक्ष शेतीचा मार्ग अवलंबून पर्जन्यमानावर अवलंबून असलेल्या शेतीतील उत्पन्नाची शाश्वतता टिकवणे तसेच पर्यावरणाचे संतूलनही टीकवणे हा या आयोजनामागील उद्देश होय. कोणताही व्यवसाय हा किमान किफायतशीर हवा हे बाजाराचे सूत्र आहे. त्यासाठी वृक्ष लागवड करणारे शेतकरी आणि त्या वृक्ष शेतीतून मिळणारे उत्पन्नाला उपलब्ध असणारी बाजारपेठ याचा समन्वय या आयोजनातून घालून देण्यात आला. विभागीय असणाऱ्या मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २०७, जालना जिल्ह्यातील ६३, परभणी जिल्ह्यातील ५५, हिंगोली जिल्ह्यातील ३७ असे एकूण ३६२ वनशेती करणारे शेतकरी सहभागी होते. तर उर्वरीत वृक्ष खरेदीदार कंपन्यांचे संचालक व शासकीय प्रतिनिधी उपस्थित होते.

मिट्कॉन नेचर बेस्ड सोल्युशन्सचे भगतसिंग शेळके,जे.के.पेपर लि. चे संदीप घाटे, नेटीव्ह कोनबॅक बांबू प्रोड्क्टसचे संजीव करपे, इंदुराव सॅंडल प्रोडक्ट्सचे राजेंद्र गाडेकर, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे सी.यु. मराडे, फळ संशोधन केंद्राचे वरिष्ठ शासत्रज्ञ डॉ. संजय पाटील इ. तज्ज्ञ व महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर, जैन टिश्यु कल्चर, जैन हायटेक प्लांट फॅक्ट्री, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., जैन ठिबक, जैन सोलार, ग्रीन सेन्स एनर्जी सिस्टीम्स, ग्रीन सेन्स सोलार वॉटर हिटर, महात्मा गांधी मिशन कृषी विज्ञान केंद्र, गांधेली अशा विविध संस्थांनी आपले स्टॉल्सही या कार्यक्रमात आणले होते.

कृषी विभागाच्या कृषी वानिकी योजना, बांबू उद्योगातील संधी, पेपर उद्योगातील संधी, चंदन शेती व बाजारपेठेतील संधी, वृक्ष लागवड, बाजारपेठ व निर्यात संधी अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तएच केशर आंबा गुणवत्ता केंद्र हिमायत बाग , एमजीएम च्या गांधेली येथील कृषी विज्ञान केंद्रास शेतकऱ्यांनी क्षेत्रभेटीही दिल्या.

विभागीय वनअधिकारी सामाजिक वनीकरण श्रीमती कीर्ती जमदाडे कोकाटे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. याद्वारे शाश्वत शेती आणि पर्यावरण संवर्धन अशा दोन्ही उद्दिष्टांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल नक्कीच चांगले पडले आहे

संबंधित पोस्ट

माजी सैनिकांसाठी 23 मे रोजी मेळाव्याचे आयोजन

कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित; प्रशासन सज्ज,चोख बंदोबस्त,अफवांवर विश्वास ठेवू नका-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

उत्तराखंड 🌧️: रुद्रप्रयाग, चमोली आणि बागेश्वर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे ५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण अद्याप बेपत्ता जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन संघ बचाव व मदत कार्यात व्यस्त आहेत.पाऊस आणि भूस्खलनामुळे या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन जीवन गंभीरपणे प्रभावित…

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदासाठी  आरक्षण जाहीर

vishwatmaklokswamivarta

माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार- राज्‍य माहिती आयुक्त गजानन निमदेव

व्यायामशाळा बांधकामाच्या अनुदान रकमेत वाढ पात्र संस्थांनी लाभ घ्यावा