vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

२०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी आरटीई २५% (RTE) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी. सय्यद अशफाक अली.डॉ बी. बी चव्हाण विभागीय शिक्षण उपसंचालक यांना निवेदन सादर …

 २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी आरटीई २५% (RTE) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी. सय्यद अशफाक अली.डॉ बी. बी चव्हाण विभागीय शिक्षण उपसंचालक यांना निवेदन सादर …

 

राज्य प्रतिनिधी –

औरंगाबाद- काँग्रेस माथाडी कामगार चे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अश्फाक अली यांनी डॉ. बी. बी चव्हाण विभागीय शिक्षण उपसंचालक यांना निवेदन सादर करण्यात आले की, सन २०२५-२०२६ वा शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षण घेण्यासाठी २५% (RTE) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दि.१४/०१/२०२५ ते २७/०१/२०२५ या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. परंतु अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास पालकांची चांगलीच दमछाक होत आहे. तसेच अर्जदारास अर्ज करतांना स्वतःच्या घराचे गुगल लोकेशन (Google Location) अचूक टाकावे लागत आहे. परंतु अर्ज करतांना संकेतस्थळ वारंवार हँग होऊन गुगल लोकेशन (Google Location) बरोबर दर्शविले जात नाही त्यामूळे पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अर्ज करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. तसेच भरपूर प्रमाणामध्ये अर्जदार अद्यापही अर्ज भरण्यास राहिलेले आहे.

डॉ बी.बी चव्हाण विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सर्व परिस्थितीचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी आरटीई २५% ऑनलाईन (RTE) अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी सय्यद अशफाक अली, शेख इमरान यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट

राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार राज्य शासनाचे सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट – उपमुख्यमंत्री

मुद्रांकाचे अतिरीक्त शुल्क आकारल्यास तक्रार करावी

vishwatmaklokswamivarta

आषाढी एकादशी यात्रा: पूर्वतयारी आढावा बैठक भाविकांना सुरक्षा, स्वच्छता आणि सेवा द्या – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाराष्ट्र गट-ब संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५ :एकापेक्षा अधिक गुणवत्ता यादीत नाव आले तरी नियुक्ती एका संवर्गातच..

राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकून आंबे, बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, गुळ, खाद्यतेल, तूप,  इ. अन्न पदार्थ तसेच भेसळ म्हणून वापरण्यात येणारे अन्न पदार्थाच्या सुमारे ९७ लाख १९ हजार ९६३ रुपये किंमतीचा ८४ हजार ३३५ किलो इतका साठा जप्त

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गितांवर सामुहिक कवायत कार्यक्रम;जिल्ह्यातून सव्वा लाख विद्यार्थी सहभागी होणार

vishwatmaklokswamivarta