vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नागपूर येथील मेडिट्राना हॉस्पिटलच्या दुर्व्यवस्थेची तातडीने चौकशी करावी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे• नगरविकासच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने १५ दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश

नागपूर येथील मेडिट्राना हॉस्पिटलच्या दुर्व्यवस्थेची तातडीने चौकशी करावी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे• नगरविकासच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने १५ दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश

 

मुंबई, प्रतिनिधी नागपूर येथील मेडिट्राना हॉस्पिटलकडे अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र नसणे तसेच इमारत बांधकामामध्ये अनियमितता असूनही हॉस्पिटल सुरू ठेवण्यासाठी जबाबदार असणाऱ्या नागपूर महानगरपालिकेतील संबंधित उपायुक्त, वैद्यकीय अधिकारी, नगररचनाकार यांची नगरविकास विभागाच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत १५ दिवसांत चौकशी करण्यात यावी, असे निर्देश महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मेडिट्राना हॉस्पिटलसंदर्भातील अनियमिततेबाबत आमदार विकास ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकी झाली. या बैठकीस नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

 पालकमंत्री श्री.बावनकुळे यांनी ‘मेडिट्राना’ बाबतच्या तक्रारीचा सविस्तर आढावा घेतला. श्री. बावनकुळे म्हणाले, हॉस्पिटल हे रुग्णांच्या सेवेसाठी असते. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी त्यांनी सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. बांधकाम अनियमितता अथवा अग्निशमन ना हरकत नसणे ही गंभीर बाब आहे. हॉस्पिटल बंद करणे हा शासनाचा उद्देश नसून ते सुस्थितीत कार्यरत राहणे गरजेचे असल्याने त्यांना कायद्यानुसार नोटीस देऊन एका महिन्यात त्यातील त्रुटी पूर्ण करून घ्याव्यात. याचबरोबर या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील सर्व रुग्णालयांची तपासणी करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

अनियमिततेसंदर्भात मेडिट्राना हॉस्पिटलबाबत तक्रार प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने बॉम्बे नर्सिंग ॲक्ट १९४९ नुसार हॉस्पिटलला नोटीस देऊन त्रुटींची पूर्तता करून घ्यावी, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.नगरविकास विभागाच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीमध्ये आरोग्य विभागाचे सहसचिव तसेच अग्निशमन विभागाचे अधिकारी यांचा समावेश करावा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

संबंधित पोस्ट

लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर क

vishwatmaklokswamivarta

ऊर्जा क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून-पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरूवात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महावितरणमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन-अमेरिकेच्या ‘द रॉकफेलर फाउंडेशन’, ‘ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट’ व ऊर्जा विभाग यांच्या सहकार्यातून उपक्रम

vishwatmaklokswamivarta

एमएमआरडीएच्या  चेंबूर ते ठाणे दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या फ्री वे एक्स्टेंशनच्या कामात बाधीत होत असलेल्या १६९४ झोपडपट्टीधारकांपैकी चार झोपडपट्टी धारकांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप

आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षा’च्या माध्यमातून लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे गुरुवारी धरणे व निदर्शने आंदोलन

रायगड हे केवळ पर्यटनस्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनावे-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह-छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन..