vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बुलढाणा नगरपरिषद क्षेत्रात ‘नक्शा’ पथदर्शी कार्यक्रम-  आज उद्घाटन होणार

बुलढाणा नगरपरिषद क्षेत्रात ‘नक्शा’ पथदर्शी कार्यक्रम-  आज उद्घाटन होणार

 

बुलढाणा, प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्डस मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत भारतीय सर्वेक्षण संस्थेच्या मदतीने देशातील सुमारे 100 शहरांमध्ये भूमि अभिलेख तयार करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ‘नक्शा’ हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. याअंतर्गत राज्यातील 10 स्थानिक स्वराज्य संस्थापैकी बुलढाणा नगरपरिषद क्षेत्रात नगर भूमापनाकरिता ‘नक्शा’ हा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे मंगळवारी दि. 18 फेब्रुवारी रोजी प्रातिनिधीक स्वरूपात केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय व भूमि संसाधन मंत्री शिवराजसिंह चव्हाण, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत ऑनलाईन उद्घाटन होणार आहे.

राज्यातील नगरपरिषद क्षेत्रातील जमिनीचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्याबाबतचा गावठाण जमाबंदी प्रकल्प हा ग्रामविकास, भूमि अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त सहभागाने नगरपरिषद हद्दीत राबविण्याची मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत नगरपरिषद भूमापन न झालेल्या जमिनीचे भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरूपात अभिलेख व नगरपरिषद क्षेत्रातील मिळकतींचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यात येणार आहे. नगरपरिषद हद्दीतील भूमापन प्रकल्प योजनेअंतर्गत तयार होणाऱ्या शासनाच्या मिळकतीचे संरक्षण होईल. मिळकतीचा नकाशा व सिमा निश्चित होवून मिळकतीचे नेमके क्षेत्र माहित होईल, अशा मिळकत पत्रिका तयार करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांच्या नागरी हक्काचे संरक्षण होणार आहे. त्याचप्रमाणे नगरपरिषद हद्दीच्या क्षेत्रातील रस्ते तसेच नगरपरिषदेच्या मालकीच्या खुल्या जागा, नाला यांच्या सिमा निश्चित होईल. या योजनेमुळे मिळकत पत्रिका तयार झाल्याने घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. बाजारपेठेत मिळकतींना तरलता येवून नागरिकांची आर्थिक पत उंचावणार आहे. नगरपरिषद हद्दीतील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होवून सर्व कार्यपध्दती पारदर्शकपणे राबविली जाणार असून नागरिकांना अधिकार अभिलेख सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

प्रकल्पाचे फायदे : जमिनीची मिळकत पत्रिका, मालमत्ता पत्रक मिळेल, शासनाच्या मिळकतीचे संरक्षण होईल, मिळकतीचा नकाशा व सिमा निश्चिती, मिळकतीचे नेमके क्षेत्र कळणार, कार्यपध्दती पारदर्शकता, कर्ज सुविधेत सुलभता, नागरिकांची आर्थिक पत उंचावणार आदी फायदे या प्रकल्पाच्या माध्यमातून होईल.

मान्यवरांच्या उपस्थ‍ितीत कार्यक्रम,या कामाचा शुभारंभ आज मंगळवारी दि. 18 फेब्रुवारी रोजी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आ. धिरज लिंगाडे , जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील, भुमि अभिलेख उपसंचालक डॉ लालसिंग मिसाळ, उप विभागीय अधिकारी शरद पाटील, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नरेंद्र झांबरे, जिल्हा सह आयुक्त जी.एस.पेंटे यांच्या शुभ हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाउ सभागृह येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थ‍ित राहण्याचे आवाहन भूमि अभिलेखचे उप अधीक्षक व्हि.ए.सवडतकर व गणेश पांडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी केले आहे.(NAKSHA :- NATIONAL GEOSPATIAL KNOELADGE

संबंधित पोस्ट

विदर्भ व मराठवाडा दूग्ध विकास प्रकल्पा अंतर्गत आता पशुपालकांना 100 टक्के अनुदानावर चारा बियाणे-अनुदानासाठी पशुपालकांनी विहित कालावधीत अर्ज करावेत -जिल्हाधिकारी

श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट कल्याण तर्फे गरजूना अन्न धान्य व ब्लेन्केट वाटप

vishwatmaklokswamivarta

आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क; पालकमंत्री प्रकाश आबिटकर २३ नागरिक जिल्ह्यात सुखरूप परतले, ८० नागरिक दुबईहून ६ मार्च रोजी पोहोचतील

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान व 16 जानेवारीला मतमोजणी..

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अचानक परीक्षा केंद्रावर

उच्च न्यायालयात सिंहगडएक्स्प्रेसच्या थांब्यासाठी-अशी मागणी पुणे प्रवासी संघाने केली