vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोलवड येथे कृषी ड्रोन प्रात्यक्षिक जनजागृती शिबिर

कोलवड येथे कृषी ड्रोन प्रात्यक्षिक जनजागृती शिबिर

 

बुलढाणा, प्रतिनिधी : तालुक्यातील कोलवड येथे कृषी विभाग आणि कॉन्फ्लाय डायनॅमिक्स यांच्या पुढाकारांने कृषी ड्रोन प्रात्यक्षिक व जनजागृती शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. या कार्यक्रमास शेतकरी, विद्यार्थी आणि कृषी व महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

हा उपक्रम जिल्हा कृषी कार्यालय आणि कॉन्फ्लाय डायनॅमिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास तहसीलदार विठ्ठल कुमरे, कृषी सहाय्यक रवींद्र म्हस्के, कृषी पर्यवेक्षक संदीप आंभोरे, कोलवडचे सरपंच कौतीकराव पाटील, जिजामाता महाविद्यालय प्राचार्य डॉ. सुरेश गवई तसेच प्राध्यापक व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रगतीशिल शेतकरी साहेबराव पाटील, यांनी या ड्रोन प्रात्यक्षिकाचा अनुभव घेतला.

या कृषी ड्रोनच्या प्रात्यक्षिकात औषध फवारणी, पिकांचे आरोग्य परीक्षण आणि अचूक शेती तंत्रज्ञानाचा माहिती देणेयात आली. कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानांतर्गत शेतकऱ्यांसाठीच्या शासकीय योजना व अनुदानाची माहिती देण्यात आली. आधुनिक शेती तंत्र आणि कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधून रोजगाराच्या संधींवर चर्चा करण्यात आली. या प्रात्यक्षिकादरम्यान शेतकरी व विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष सहभागासह प्रश्नोत्तर सत् घेण्यात आले तसेच ड्रोन शेतीचे फायदे आणि नियमांविषयी माहिती देण्यात आली.

या ड्रोन प्रात्यक्षिकासाठी कृषी विभाग आणि कॉन्फ्लाय डायनॅमिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल कस्तुरे पुढाकार घेत त्यांच्या कार्यालयातील कोमल शेलके आणि निलेश बाहेकर यांच्या सहकार्य हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.०००

संबंधित पोस्ट

ज्येष्ठ नागरिकांना मुंबईत छत्री वाटप

सर्वसामान्यांसाठीच्या योजना सुलभतेने पोहचाव्यात यावर भर – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कोराडी महालक्ष्मी ते अयोध्या तिर्थदर्शन यात्रेस प्रारंभ

समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर–प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत

vishwatmaklokswamivarta

नागपूर येथील प्राणी संग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे- वनमंत्री गणेश नाईक

मुंबईतील धारावीत महिलेवर गोळीबार..

ग्लोबल चित्रपट निर्मितीसाठी ‘इंडिया सिने हब पोर्टल’चा वापर करण्याचा केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह; दुर्लक्षित भागात कमी खर्चातील चित्रपटगृहांच्या विकासासाठी रोडमॅपही सादर