vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्रामपंचायत सावळी येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

ग्रामपंचायत सावळी येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

 

            सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्यावतीने मिरज तालुक्यातील ग्रामपंचायत सावळी येथे पालकांची देखभाल आणि कल्याण, ज्येष्ठ नागरिक कायदा व बालकांचे कायदे (Maintenance & Welfare of Parents & senior Citizen Act & Childrens Act) याबाबत जनजागृती कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले.

 या शिबिराचे प्रमुख वक्ते जिल्हा विधी प्राधिकणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी उपस्थित मुलींना गुड टच.. बॅड टच याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी मुलांच्या शिक्षणावर जास्तीत जास्त भर देवून मुलांना चांगले अधिकारी बनवावे व देशाचे आदर्श नागरिक बनवावे, असे आवाहन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली या कार्यालयाची माहिती करून देऊन या कार्यालयामार्फत गरजूंना मोफत कायदेविषयक सल्ला व मोफत विधी सेवा पुरविली जाते याची माहिती ग्रामस्थांना दिली.

 अॅड. श्रीमती मायाक्का महानवर, विधिज्ञ सांगली यांनी पालकांची देखभाल आणि कल्याण, ज्येष्ठ नागरिक कायद्याबाबत माहिती दिली. या कायद्यामध्ये वयस्कर व्यक्तिंना ज्यांची मुले सांभाळत नाहीत त्यांना कोठे, कशा प्रकारे न्याय मिळविता येईल व त्याबाबत कोठे अर्ज करावयाचा याची माहिती दिली. मुलांनी जर फसवून त्यांची मालमत्ता हस्तांतरण केली असेल तर त्याबाबत कोठे दाद मागवयाची याची सविस्तर माहिती दिली. जेणेकरून वृध्दापकाळामध्ये त्यांना आधार शोधावा लागणार नाही. तसेच शाळेतील मुला मुलींना बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायदा 2012 याची माहिती करून दिली.  प्रास्ताविक विजय कोगनोळे यांनी केले. आभार नितीन आंबेकर यांनी मानले. सूत्रसंचालन ग्रामसेवक जमीर पटेल यांनी केले. कार्यक्रमास सावळी ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

शहरात प्रतिबंधात्मक कलम 37 (1) व (3) लागू

३ वर्षाच्या अपहरण झालेल्या मुलीची मुंबई पोलिसांनी वरळी पोलिसांनी काही तासातच सुटका केली.

vishwatmaklokswamivarta

पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना कोणतेही अधिकचे नियम न लावता तसंच नियम शिथिल करून नागरीकेंद्रित मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 

vishwatmaklokswamivarta

आज नव्या मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली  वाशी येथे जनता दरबाराचे आयोजन

केंद्र सरकार आणत असलेल्या एफसीआरए या दुरुस्ती विधेयकाला विरोध खासदार सुप्रिया सुळे

चौथे विश्व मराठी संमेलन मराठीचा शुद्ध, सक्षम आणि प्रभावी वापरासाठी माध्यमांचा नेहमीच पुढाकार -मराठी परिसंवादातील सूर