vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

सहकार बँक कॉलनीत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा!

सहकार बँक कॉलनीत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा!

जालना प्रतिनिधी : येथील सहकार बँक कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प. पू. डॉ. भगवान महाराज आनंदगडकर यांच्या कृपाशिर्वादाने गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. तर उद्या हभप श्री. संत डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांचे काल्याचे किर्तन आणि नंतर महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार असल्याचे संस्थानचे सचिव संपतराव पाटील व विश्वस्त मंडळाने कळविले आहे. दरम्यान, काल रात्री हभप उध्दव महाराज वाघमारे यांचे किर्तन झाले. त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या ओवींवर आधारित कीर्तन केले. या कीर्तनातून त्यांनी आजच्या जीवनावरील विविध उदाहरणे आपल्या कीर्तनातून दिली. त्यावेळी उपस्थितांनी त्यांना चांगलीच दाद दिली. ज्यांची संपूर्ण माया ही देवाजवळ आहे, ते खरे भाग्यवंत आणि सुखी असल्याचेही सांगून ते म्हणाले की, कुणाला अंतरंग आवडतात तर कुणी बाह्य रंगावर जातात. परंतू मनुष्याचे अंतरंग नेहमीच चांगले आणि सुंदर असायला हवे. तन आणि धन यां मधला फरकही त्यांनी यावेळी स्पष्ट करुन सांगितला.

00000000

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणे

परभणी जिल्हा बँकेतील १५२ पदांच्या भरतीला २०२२ मध्ये मंजुरी..

vishwatmaklokswamivarta

वाढवण प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारांच्यादृष्टीनेकौशल्य विकास कार्यक्रम तयार करा- मंत्री नितेश राणे

जिल्हा व सत्र न्यायालय येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय शालेय(मुले) फुटबॉल लिग स्पर्धा; 10 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत सात पर्यटनस्थळे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय, जम्मू-काश्मीरमधील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी सुरु