vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

98 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन‘अभिजात मराठी’चा जयघोष, ग्रंथदिंडीने संमेलनाचा जागर सुरू तालकटोरा स्टेडियमचा परिसर मराठीमय…

98 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन‘अभिजात मराठी’चा जयघोष, ग्रंथदिंडीने संमेलनाचा जागर सुरू तालकटोरा स्टेडियमचा परिसर मराठीमय…

नवी दिल्ली, प्रतिनिधी: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 98 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनानिमित्त आज सकाळी भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी मराठीजन, लोकनृत्यांचे सादरीकरण व ‘अभिजात मराठी’च्या जयघोषाने राजधानीतील तालकटोरा स्टेडियमचा अवघा परिसर मराठीमय झाला होता.

जुन्या संसद परिसरातील रकाबगंज गुरूद्वाराजवळ ग्रंथपूजन, ध्वजारोहण होऊन ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. यावेळी संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, अ. भा. म. सा. महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, मावळते अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, खासदार सुप्रिया सुळे, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांच्यासह अनेक ज्येष्ठ साहित्यिक, दिल्लीतील आणि महाराष्ट्रातून आलेले हजारो मराठी बांधव मोठ्या उत्साहाने मराठमोळ्या वेशभूषेत दिंडीत सहभागी झाले. यावेळी पंढरपूर येथून साहित्य संमेलनासाठी आलेली विशेष दिंडीही सोबत होती.

ढोलताशाच्या गजरासह दिंडीत लावणी, पोतराज, वाघ्या-मुरळी, गोंधळ, पोवाडा, वासुदेव, आदिवासी नृत्य आदी लोककला, लोकनृत्यांचे सादरीकरण झाले. यावेळी महिलांनी उत्स्फुर्तपणे फुगडी खेळली.

महाराष्ट्राच्या चित्ररथाने जिंकली दिल्लीकरांची मनेसंत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, गड-किल्ले, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या रचना अशी आकर्षक सजावट चित्ररथावर करण्यात आली होती. दिल्लीकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनातर्फे विशेष चित्ररथ तयार करण्यात आला. या चित्ररथाच्या माध्यमातून देशाच्या राजधानीत महाराष्ट्राच्या अभिजात भाषा- संस्कृतीचे दर्शन घडले.०००००

संबंधित पोस्ट

राज्यात बॉम्बस्फोट करण्याची धमकीचा संदेश; मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाला धमकीचा ईमेल भारत-पाकिस्तान तणाव परिस्थीतीदरम्यान मुंबई हाय अलर्ट..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना श्रद्धांजली चतुरस्त्र अभिनेता, कला क्षेत्रातील मार्गदर्शक दुवा

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर 16 टनापेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या सर्व वाहनांना पूर्णत: बंदी

आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क; पालकमंत्री प्रकाश आबिटकर २३ नागरिक जिल्ह्यात सुखरूप परतले, ८० नागरिक दुबईहून ६ मार्च रोजी पोहोचतील

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत सदनिका आणि भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत संपन्न,सर्वसामान्यांना परवडणारी, दर्जेदार घरे देण्यासाठी शासन कटीबद्ध-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

भविष्यवेधी विकास आणि तंत्रज्ञानाधरीत नियोजन प्रक्रियेतील गतिमानतेसाठी ‘महाटेक’ संस्था उभारावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश