vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

           जालना, प्रतिनिधी:- जिल्ह्यात इयत्ता दहावी व बारावीच्या शैक्षणिक परीक्षा सुरु आहेत. तसेच आगामी महाशिवरात्री, रमजान या सण, उत्सव आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.6 मार्च 2025 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी जारी केले आहेत.

    संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 6 मार्च 2025 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना -२६ जानेवारीपर्यंत लागू करण्याच्या दृष्टीने परिपूर्ण आराखडा तयार करा- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोचा ‘जागतिक वारसा दर्जा’ मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार याच्या नेतृत्वात शिष्टमंडळ रवाना

vishwatmaklokswamivarta

एक दिवा सैनिकांसाठी – दिवाळी सकाळ सैनिकांच्या परिवारासोबत उपक्रम उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

पलूस नवोदय विद्यालयात प्रवेश अर्जासाठी 29 जुलैची मुदत..

vishwatmaklokswamivarta

कृषी केंद्रांनी 10 ऑगस्टपूर्वी ई-पॉसबसवावे*साठ्यामधील तफावतीमुळे कृषी निविष्ठा केंद्रावर कारवाई

दिवंगत पत्रकारांच्या नावे स्तंभ बनवा-विकासकुमार बागडी