vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

राष्ट्रीय महिला आयोगाचा उपक्रम; येत्या ८ मार्चपासून जिल्हा मुख्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कार्यान्वित होणार

राष्ट्रीय महिला आयोगाचा उपक्रम; येत्या ८ मार्चपासून जिल्हा मुख्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कार्यान्वित होणार

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी

राष्ट्रीय महिला आयोगामार्फत महिलांचे सक्षमीकरण व सस्नेही कुटुंब या साठी जिल्ह्यात येत्या ८ मार्च पासून विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असून त्यासाठी योग्य स्थळाची निवड करा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांना दिले. या उपक्रमासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा,असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाने दिले आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगाने या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे की, विवाहाशी निगडीत समस्या, त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक समस्या, महिलांशी संबंधित हिंसाचार, घटस्फोट रोखण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन केंद्र उपयुक्त व महत्त्वाचे ठरु शकतात. त्यासाठी जिल्हा मुख्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र स्थापन करावे,असे निर्देश या पत्रात देण्यात आले आहेत.

    प्रत्येक जिल्ह्यात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र सुरु करण्यात येणार आहे. ही केंद्र येत्या ८ मार्च पासून कार्यान्वित करावी,अशा सुचना राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्या आहेत. त्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, मुद्रांक जिल्हाधिकारी विवेक गांगुर्डे यावेळी उपस्थित होते. विवाहाच्या अल्प कालावधीतच वाढत जाणारे कौटुंबिक वाद, त्यामुळे होणारे घटस्फोट टाळण्यासाठी विवाहानंतर उद्भवणाऱ्या विविध शारीरिक मानसिक, कौटुंबिक समस्यांबाबत माहिती व्हावी. त्याची पूर्वकल्पना विवाहयोग्य दाम्पत्यास व्हावी. त्याबाबत त्यांचे समुपदेशन व्हावे. शिवाय परस्परांबाबत माहिती होणे, परस्परांच्या नोकरीचे स्वरुप, त्यामुळे होणारे संभाव्य ताणतणाव इ. बाबत पूर्वकल्पना देतांनाच या निर्माण होऊ घातलेल्या समस्यांचे व्यवस्थापन कसे करावे? याबाबत या समुपदेशनात विवाहयोग्य वधुवरांना माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी समुपदेशक नेमले जाणार आहेत. या समुपदेशकांचे प्रशिक्षणही घेतले जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या केंद्रासाठी जागा शोधावी. शक्यतो विवाह नोंदणी कार्यालयाजवळ जागा शोधावी. तसेच नोंदणी विवाहाची सुचना केलेल्या जोडप्यांचे विवाहपूर्व समुपदेशन करावे,असे निर्देशही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

संबंधित पोस्ट

सहकार बँक कॉलनीत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा!

vishwatmaklokswamivarta

छत्रपती महाराणी ताराबाई यांचे कार्य सर्वदूर जाण्यासाठी लेखणीची गरज – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित विशेष चित्ररथाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात १७ कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

vishwatmaklokswamivarta

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ आणि पैठण, आपेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्या बाबत आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या तडजोडीसाठी ‘समाधान समारोह’ विशेष लोक अदालत वादांचे सलोख्याने निराकरण करण्यासाठी पक्षकारांना सहभागाचे आवाहन

विधानपरिषद प्रश्नोत्तरे शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर;अहवालांतील विलंबही कमी होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस