vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लोकराज्य दालनाला उपमुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी

लोकराज्य दालनाला उपमुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी..

 

नवी दिल्ली, प्रतिनिधी: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तालकटोरा स्टेडियमवरील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत उभारण्यात आलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या लोकराज्य दालनास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत , विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या.

महाराष्ट्र शासनाच्या या दालनाला गेल्या तीन दिवसापासून अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार , मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, आमदार विश्वजीत कदम, सीमा हिरे, मोनिका राजळे तसेच मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, लोकमत वृत्तपत्रसमूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, निवृत्त सनदी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्यासह मान्यवर संपादक, साहित्यिक आणि माध्यम प्रतिनिधींनी या दालनास भेट दिली.

संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी मराठी भाषा आणि साहित्य संमेलनाबाबत यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या अंकांची आस्थेने पाहणी केली. लोकराज्यशी आपला दीर्घकाळापासून ऋणानुबंध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

संबंधित पोस्ट

शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी, मोफत चष्मे मिळणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार..

स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाहीअपमानित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन सोहळ्यानंतर येत्या सोमवार व मंगळवारी असे दोन दिवस कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा साजरा होणार..

ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी ज्ञान, तंत्रज्ञान व एआयचा वापर करा* *विद्यार्थ्यांनो केवळ नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे, नवनिर्मिती करणारे आणि समस्या सोडवणारे बना–राज्यपाल जिष्णुदेव वर्मा*

vishwatmaklokswamivarta

लाडकी बहीण योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार…

vishwatmaklokswamivarta