vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रासायनिक खतांमुळे आरोग्याला धोका असल्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन 

रासायनिक खतांमुळे आरोग्याला धोका असल्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन

 

राज्य प्रतिनिधी – रासायनिक खतांच्या वापरामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो.देशात कॅन्सर सारखा रोग वाढताना दिसत आहे.ते रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक शेती पेक्षा सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे.आरोग्य आणि निसर्ग यांच्या हिता साठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केल ,सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्र येथे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण कार्यक्रमात ना.रामदास आठवले बोलत होते.प्रधानमंत्री

नरेंद्र मोदी भागलपूर येथुन दृकश्राव्य माध्यमातून7 उपस्थित होते. विचारमंचावर शाबरी कृषी प्रतिष्ठान चे अध्यक्ष दीपक गायकवाड; प्रमुख कृषी शास्त्रज्ञ लालासाहेब तांबट; डॉ.राजेंद्र मराठे; शुक्राचार्य भोसले; रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा सरवदे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यावेळी

शेतकरी सन्मान निधी चे देशभरातील 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हजार कोटी जमा करण्यात आले.मागील 2019 पासून ही शेतकरी सन्मान निधी योजना सुरू असून आता पर्यंत अव्याहतपणे सर्व हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत.शेतकऱ्यांना वर्षाला मिळणारे 6 हजार रुपये ही शेतकऱ्यांसाठी मौलिक मदत ठरत आहे.या पीएम शेतकरी सन्मान निधीचा महिला शेतकरी ही मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

00000

संबंधित पोस्ट

बातमीचा राग- राग करून पोलिसांत खोटी तक्रार करणाऱ्या प्रियंका राजपूतची हकालपट्टी करा; पत्रकारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी-अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा ईशारा पत्रकारांचा जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,महापालिका आयुक्तांना ईशारा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते इंगोले नगरमधील नागरिकांना जागेची सनद बहाल स्वमालकीची जागा असल्याची सनद मिळाल्याने पट्टेधारकांच्या डोळ्यात आनंदाश्रू; ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत विशेष मोहीम

मलेशियात क्वालालंपूर येथे झालेल्या 22 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागात विविध पदासाठी भरती- शिकाऊ उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

मतदान शांततेत पार पडावे म्हणून जिल्ह्यात मनाई आदेश-7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta

शांताई सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने आपत्तीग्रस्त कुटुंबांना जीवनोपयोगी साहित्य वाटप