vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बुलढाण्यात उद्यापासून ‘राजमाता महोत्सव’१५० स्टॅाल्सद्वारे प्रदर्शन व विक्री ; खाद्यपदार्थांची मेजवाणी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती

बुलढाण्यात उद्यापासून ‘राजमाता महोत्सव’१५० स्टॅाल्सद्वारे प्रदर्शन व विक्री ; खाद्यपदार्थांची मेजवाणी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती

 

 राज्य प्रतिनिधी: जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनवलेल्या उत्कृष्ट व दर्जेदार उत्पादनांच्या प्रदर्शन व विक्रीसाठी बुलढाण्यात उद्या शुक्रवार दि. २८ फेब्रुवारीपासून राजमाता महोत्सवाला सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यातील उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत शहरातील जिजामाता प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुल येथे दि. २८ फेब्रुवारी ते ४ मार्चपर्यंत विभागीय, जिल्हा व मिनी सरस अंतर्गत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात १५० स्टॅाल्सचे भव्य प्रदर्शन व त्याद्वारे उत्पादनांची विक्री केली जाणार आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियोजनानुसार या राजमाता महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांच्या हस्ते होणार असून केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री ना.रक्षा खडसे, कामगार मंत्री ना.ॲड. आकाश फुंडकर यांच्यासह आमदार ना. किरण सरनाईक, ना. वसंत खंडेलवाल, ना. धीरज लिंगाडे, ना. चैनसुख संचेती, ना.डॅा.संजय कुटे, ना.संजय गायकवाड, ना.श्वेता महाले, ना.सिद्धार्थ खरात, ना. मनोज कायंदे आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

खाद्यजत्रा

या महोत्सवात ग्रामीण भागातील अस्सल शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध राहणार असून ग्रामीण खाद्यपदार्थांची आवड असलेल्या बुलढाणावासियांसाठी हा महोत्सव ‘खाद्यजत्रा’ म्हणून नावारुपास येणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

उद्यापासून सुरु होणाऱ्या राजमाता महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून पहिल्या दिवशी शुक्रवार दि. २८ फेब्रुवारीला प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ऐ.जे. डान्स गृपचा नृत्य कार्यक्रम होणार आहे. शनिवारी दि.१ मार्चला प्रसिद्ध कलाकार बापु चव्हाण प्रस्तुत गजर महाराष्ट्राचा हा लोककला कार्यक्रम, रविवारी दि. २ मार्चला स्वप्निल आराख प्रस्तुत स्वर मिलाप ऑर्केस्ट्राद्वारे हिंदी व मराठी गाण्यांची मेजवाणी, सोमवारी दि. ३ मार्चला युवाशाहीर विक्रांतसिंह राजपुत यांचा पोवाडे व स्फुर्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे. हे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता होणार आहेत. तर मंगळवारी दि. ४ मार्च रोजी सुनबाई लई भारी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता रोहन पाटील आणि टीमची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

राजमाता महोत्सवांचा समारोप दि. ४ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता होणार असून अंतिम टप्प्यात जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील सृजनशीलतेच्या भव्य प्रदर्शन व विक्रीसाठीच्या या राजमाता महोत्सवास बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थितीत राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, प्रकल्प अधिकारी राजेश इंगळे यांनी केले आहे

संबंधित पोस्ट

शहर पाणीपुरवठा योजना; संयुक्त तांत्रिक पाहणी करुनअहवाल सादर करावा- इ.मा.व.कल्याण मंत्री अतुल सावे..

vishwatmaklokswamivarta

म्हाडाची 1 ऑक्टोबर रोजी सोडत

vishwatmaklokswamivarta

बारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांचे नाव

मराठी तरुणांनी आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे -मराठी पाऊल पडते पुढे या चर्चासत्रातील सूर..

vishwatmaklokswamivarta

भारत आणि सेशेल्सचे संबंध मैत्रीपूर्ण आणि धोरणात्मक – सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी-दोन्ही देशांतील संवादातून विकासाच्या नव्या संधीचे दालन उघडणार…

vishwatmaklokswamivarta

मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘एज्युकेट गर्ल्स’ संस्थेसोबत शासनाचा सामंजस्य करार