vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

11 मार्च रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत..

11 मार्च रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत..

     नवी मुंबई प्रतिनिधी:- कोंकण विभागातील पेन्शन अदालत दरमहा दुसऱ्या मंगळवारी आयोजित करण्यात येते. या महिन्यातील विभागीय पेन्शन अदालत मंगळवार दि. 11 मार्च 2025 रोजी सकाळी 11.00 वा. कोकण भवनातील कक्ष क्र. 106 सामान्य प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय कोंकण भवन येथे आयोजित केली आहे.

 या पेन्शन अदालतीमध्ये महसूल विभागातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पेन्शन प्रकरणांच्या अडचणींचे निवारण करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रकरणांबाबतच्या तक्रारी असल्यास सदर दिवशी त्याबाबतचे अर्ज स्वीकारले जातील. कोकण विभागातील पेन्शन धारकांनी या पेन्शन अदालतीला उपस्थित राहून पेन्शन विषयी आपले प्रश्न उपस्थित करावे. असे कोकण विभाग तहसिलदार,(सामान्य प्रशासन) महेंद्र बेलदार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                       *********

संबंधित पोस्ट

गणेशोत्सवासाठी राज्य शासनाची विशेष योजना

वाशिम, अमरावती आणि धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आढावा

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर अमेरिकेतील ‘आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर’ पुरस्कार

बंद उद्योग घटकांनी एक महिन्याचा आत उद्योग सुरू करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शालेय सहलींतून एसटीला मिळाले १२७ कोटींचे उत्पन्न— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पदवीबरोबरच कौशल्यही महत्त्वाचे; उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त सोहळा