vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

 

अलिबाग, प्रतिनिधी-

कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी, मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन सार्वजनिक वाचनालय डोंगरे हॉल, अलिबाग येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय रायगड आणि सार्वजनिक वाचनालय डोंगरे हॉल यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैलाताई पाटील तर व्यासपीठावर वर्षाताई कुवळेकर, अनंत देवघरकर, विलास नाईक आणि ग्रंथ मित्र नागेश कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला अलिबाग शहरातील लेखक, कवी, साहित्यिक, पत्रकार आणि वाचकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी लेखक विलास नाईक यांनी परिस्थिती अभावी आपले साहित्य छापू न शकणाऱ्या साहित्यिकांना शासनाने मदतीचा हात द्यावा, असे प्रतिपादन केले. वर्षाताई कुवळेकर यांनी ग्रंथालयातील वाचनामुळे लेखक म्हणून घडण्यास मदत होत असल्याचे सांगितले आणि दर्जेदार साहित्याचे संकलन करण्याची गरज व्यक्त केली.

शैलाताई पाटील यांनी मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या घरापासूनच सुरू करावी, असे मत मांडले. श्रुती राजे देसाई यांनी मराठीचा दैनंदिन व्यवहारात वापर वाढवण्याचे आवाहन केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी अभिजात भाषा फक्त कागदावर न राहता ती जीवनात रुजली पाहिजे, असे सांगत मराठी वृत्तपत्रे आणि नियतकालिके प्रत्येक घरात पोहोचावीत, यावर भर दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष बोन्द्रे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अजित पवार यांनी मानले. यावेळी अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार हर्षद कशाळकर, वर्षा दिवेकर, संध्या कुळकर्णी, भालचंद्र वर्तक, अँड. राजेंद्र जैन, आर. के. घरत, नंदु तळकर, रजिता माळवी, हेमकांत सोनार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एकत्र येण्याचा निर्धार करत कार्यक्रमाचा समारोप झाला.

संबंधित पोस्ट

जनगणना कामासाठी अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पहिल्यांदाच होणार #डिजिटलजनगणना ; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण #कार्यशाळा संपन्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी कोंडवाडे बांधण्याकरिता जागा निश्चित करुन प्रस्ताव सादर करा -उपमुख्यमंत्री

7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

भाजपा जिल्हा कार्यालयात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व लोकनेते रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची आरती मंगलमय वातावरणात संपन्न

vishwatmaklokswamivarta

चित्रपट निर्माता – निर्देशक प्रकाश मेहरा यांना अभिवादन…!

अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta