vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन रंगणार गोंडवाना विद्यापीठात

राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन रंगणार गोंडवाना विद्यापीठात

 

गडचिरोली प्रतिनिधी: गोंडवाना विद्यापीठ व विदर्भ साहित्य संघ, शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ५ व ६ मार्च २०२५ रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन सभागृहात राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रभरातील युवा साहित्यिक या संमेलनात सहभागी होणार असून परिसंवाद, कवीसंमेलन, नाट्यप्रयोग, शायरी, गझल मुशायरा आणि संगीत कार्यक्रम या माध्यमांतून हे संमेलन रंगणार आहे.

*संमेलनाचे उद्घाटन आणि ग्रंथदिंडी*युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन ५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन सभागृहात होणार आहे. यापूर्वी गडचिरोली शहरात ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध युवा अभिनेते हर्षल पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिकेत प्रकाश आमटे उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, सहस्वागताध्यक्ष प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे असतील, तर संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुप्रसिद्ध युवा साहित्यिक अक्षय चंदेल सांभाळणार आहेत. उद्घाटनप्रसंगी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण उपस्थित राहतील.

*परिसंवाद, कवीसंमेलन आणि नाट्यप्रयोग* दोन दिवसीय संमेलनात विविध चर्चासत्र, परिसंवाद, कवीसंमेलन, नाट्यप्रयोग, शायरी आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.‘आधुनिक तंत्रज्ञान व मराठी भाषा आणि साहित्य संमेलने’ तसेच ‘वर्तमानाचा वेध’ यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर परिसंवाद होणार आहे. ‘वाचायचे का? काय? कसे?’ या परिसंवादाचे अध्यक्षपद अमृत बंग भूषवतील.

दुपारी निमंत्रितांचे कविसंमेलन होणार असून त्याचे अध्यक्षपद मुंबईचे कवी जितेंद्र लाड सांभाळतील. संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्रभर गाजत असलेले जळगाव निर्मित ‘नली’ हे एकल नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.

*६ मार्चला गझल मुशायरा आणि समारोप सोहळा*६ मार्च रोजी विविध परिसंवाद, विद्यार्थ्यांचे कवीसंमेलन आणि गझल मुशायरा पार पडणार आहे. संमेलनाचा समारोप ६ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता होणार असून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक देविदास सौदागर हे समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच या वेळी सुप्रसिद्ध सरोदवादक विजया कांबळे यांच्या सरोद वादनाने संमेलनाची सांगता होईल.

हे संमेलन गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि विदर्भ साहित्य संघ, शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी सर्व साहित्यप्रेमींनी या संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

दख्खन जत्रेतून स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दख्खन जत्रा 2025 चे उद्‌घाटन- 21 मार्चपर्यंत सुरू राहणार प्रदर्शन

येत्या काळात आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरु करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर,कोल्हापूर येथे पहिल्या राज्यस्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कारांचे वितरण संपन्न..

vishwatmaklokswamivarta

माजलगाव वाळू तस्करी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सखोल चौकशी करण्यात येईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चिखलदरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 142 उमेदवारांची प्राथमिक निवडआदिवासी तरुणांनी जागतिक स्तरावर झेप घेण्याचे आमदार केवल कुमार काळे यांचे आवाहन

महारेशीम अभियानात तुती लागवडीसाठी नोंदणी सुरू अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनीलदत्त फडके

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “अस्मिता महिला लीग” आयोजनात सहभागी होण्याचे आवाहन