vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्या

साहित्य अकादमीचा साहित्योत्सव होणार दिमाखदार;7 ते 12 मार्च दरम्यान दिल्लीमध्ये भव्य आयोजन

साहित्य अकादमीचा साहित्योत्सव होणार दिमाखदार;7 ते 12 मार्च दरम्यान दिल्लीमध्ये भव्य आयोजन

नवी दिल्ली प्रतिनिधी: साहित्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा सोहळा मानला जाणारा साहित्य अकादमी साहित्योत्सव 2025 हा दि. 7 ते 12 मार्च या कालावधीत नवी दिल्लीतील रवींद्र भवन येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य अकादमीचे सचिव श्रीनिवासराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या साहित्योत्सवात 24 भारतीय भाषांतील 700 हून अधिक नामवंत साहित्यिक, लेखक, कवी आणि विचारवंत सहभागी होणार आहेत.

या साहित्योत्सवात साहित्य अकादमी पुरस्कार वितरण समारंभ, काव्यवाचन, परिसंवाद, चर्चासत्रे आणि पुस्तक प्रकाशनासारखे 150 पेक्षा अधिक कार्यक्रम होणार आहेत. यंदाच्या सोहळ्यात भारतीय भाषांमधील साहित्याचा जागतिक संदर्भ, समकालीन साहित्यिक प्रवृत्ती, नव्या लेखकांसाठी संधी आणि डिजिटल युगातील साहित्याचा प्रभाव यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार वितरण समारंभ 8 मार्च रोजी,या साहित्योत्सवातील विशेष आकर्षण असलेला साहित्य अकादमी पुरस्कार वितरण सोहळा दि. 8 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता कमानी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध भाषांतील साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदा मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

  भारतीय साहित्याची समृद्ध परंपरा साजरी करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला साहित्योत्सव 2025 हा साहित्यप्रेमींसाठी एक वैचारिक आनंदसोहळा ठरणार आहे. साहित्य रसिकांनी या भव्य सोहळ्यात सहभागी होऊन भारतीय साहित्याच्या विविधतेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन साहित्य अकादमीच्यावतीने करण्यात आले आहे.0000

संबंधित पोस्ट

नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीची तयारी पूर्ण-नगराध्यक्षासाठी २३ तर नगरसेवकसाठी ३३९ उमेदवारांचा निकाल होणार स्पष्ट..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न“जिल्ह्यातील सर्व शाळा स्मार्ट शाळा करण्यासाठी १०० कोटींचा निधी आराखडा तयार करा” — खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे“स्मार्ट आरोग्य केंद्र निर्मितीसाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा” — खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टपाली मतपत्रिकांच्या मोजणी प्रक्रियेत आणखी सुधारणा..

vishwatmaklokswamivarta

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय.

vishwatmaklokswamivarta