vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा  प्रतिनिधी: पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाईल आहे. कोणत्याही ठिकाणी नोकरी करीत नसलेल्या युवकांसाठी ही योजना आहे. या योजनेचा लभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहेअर्ज कसा करायचा : या योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करुन इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेबसाईटवर प्रोफाईल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा, उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ मार्च २०२५ आहे. या अंतर्गत युवकांना १२ महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल या सोबतच त्यांना दरमहा ५००० रुपयेही मिळतील या शिवाय इंटर्नशिप पुर्ण झाल्यानंतर ६००० रुपये एकरकमी अनुदान दिले जाईल.

या योजनेअंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाते. उमेदवारांना इंटर्नशिप संधीसाठी http://pminternship.mca.gov.in/ पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.

संबंधित पोस्ट

महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी सातारा शहरात मॉल उभारणार- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta

शहीद दिनानिमित्त मेरा युवा भारत,युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय  भारत सरकार यांच्या वतीने पदयात्रा संपन्न

नगरविकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा-छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, नांदेड, लातूर विजेते…

vishwatmaklokswamivarta

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

तीर्थक्षेत्र विकासकामे दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करावीत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता…

जिल्ह्यात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दूरीकरण मोहीम…

vishwatmaklokswamivarta