vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पी.एम.किसान “एपीके” लिंक उघडताच शेतकऱ्यांची बैंक खाती होताहेत रिकामी-फसव्या पीएम किसान ॲप्लीकेशन, लिंकपासून सावध रहा

पी.एम.किसान “एपीके” लिंक उघडताच शेतकऱ्यांची बैंक खाती होताहेत रिकामी-फसव्या पीएम किसान ॲप्लीकेशन, लिंकपासून सावध रहा

बुलडाणा, प्रतिनिधी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीएम किसान यादी किंवा पीएम किसान ॲप एपीके मॅसेजची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत असल्याचे निर्देशनात आले आहे. शेतकऱ्यांनी फसव्या पीएम किसान एपीके ॲप्लीकेशन व लिंकपासून सावध राहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी मोबाईलवर पीएम किसान लिस्ट एपीके लिंक किंवा पीएम किसान एपीके संदेशाची लिंक उघडू नये किंवा सदर लिंकचा वापर शेतकऱ्यांनी करू नये. त्याऐवजी केंद्र शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या अधिकृत https://pmkisan.gov.in/ या पोर्टलचा वापर करावा. तसेच अशी काही घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरित जवळच्या संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. ढगे यांनी केले आहे.

000000

 

संबंधित पोस्ट

पेण भूगर्भातून आवाज येवून जमिन हादरल्याच्या घटनेचेभूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्या मार्फत सर्वेक्षण..

vishwatmaklokswamivarta

खासदार सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांसाठी अनमोल भेट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची विजया मेहता यांना श्रद्धांजली

विविध उपक्रमांव्दारे इतरांच्याबद्दल सेवाभाव निर्माण करा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- महाआरोग्य शिबीर उपक्रमाबद्दल धर्मादाय अधिकाऱ्यांचे केले कौतुक

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका लोककल्याण मेळावा अंतर्गत फेरीवाल्यांसाठी अन्न सुरक्षा प्रशिक्षण संपन्न..

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंत्री मंगलप्रभात लोढा राज्यातल्या एक हजार आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण