vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज स्विकारण्यास 15 मार्च पर्यंत मुदतवाढ.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज स्विकारण्यास 15 मार्च पर्यंत मुदतवाढ.

 

रायगड प्रतिनिधी:- सन-2024-25 या वर्षापासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन स्वाधार योजनेचा लाभ घेण्याकामी दि. 15 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असून स्वाधार योजनेकरीता पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरुन दि. 15 मार्च 2025 पूर्वी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रायगड येथे सादर करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड सुनिल जाधव यांनी केले आहे.

या योजनेचे अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे दिनांक 15 जानेवारी 2025 पर्यंत स्विकारण्यात येत असल्याबाबत संबंधित महाविद्यालयांना सूचित करण्यात आले होते.

सन-2024-25 मधील स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे स्विकारण्यात आले आहेत. दि. 26 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये या योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांनी बँक तपशिल तात्काळ भरण्याची कार्यवाही करावी तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे. परंतु अर्ज व त्यासोबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती अद्यापपर्यंत सादर केलेल्या नाहीत. अशा विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रे सहाय्यक आयुक्त. समाज कल्याण, रायगड कार्यालयास तात्काळ सादर करावयाची आहेत.

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते 23 जून 2025 रोजी मुंबईत ‘संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे होणार उद्घाटन

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे प्रत्येक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे घेतले पाहिजेत-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आयटीआय मध्ये नव्या सहा अभ्यासक्रमाचीही केली घोषणा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थिएटर अकॅडमी येथील नवीन इमारतीचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार 2024 साठी अर्ज सुरू; अंतिम तारीख 15 जुलै 2025

नवी दिल्लीच्या सत्य निकेतन भागात काल दुपारी ५ मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ जण ठार, तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

vishwatmaklokswamivarta