vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते 23 जून 2025 रोजी मुंबईत ‘संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे होणार उद्घाटन

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते 23 जून 2025 रोजी मुंबईत ‘संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे होणार उद्घाटन…

राज्य प्रतिनिधी-लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सोमवार, 23 जून 2025 रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधीमंडळांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करतील. लोकसभा अध्यक्ष संसदेच्या अंदाज समितीच्या 75 व्या वर्धापन दिन स्मरणिकेचे प्रकाशन देखील करतील.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार; महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शंकर शिंदे; महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर; आणि भारतीय संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल उद्घाटन सत्राला संबोधित करणार आहेत.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन पंडितराव खोतकर उपस्थितांचे स्वागत करतील तर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आभार प्रदर्शन करतील. भारतीय संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधान मंडळांच्या अंदाज समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य; महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर या सत्राला उपस्थित राहणार आहेत.

दोन दिवसांच्या या परिषदेदरम्यान, भारतीय संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळांच्या अंदाज समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य पुढील विषयावर विचारमंथन करतील:

‘प्रशासनात कार्यक्षमतेसाठी आणि आर्थिक शिस्तीसाठी अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन मंगळवार, 24 जून 2025 रोजी, समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला; राज्यसभेचे उपसभापती हरिवंश; भारतीय संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष संजय जयस्वाल; आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील समारोप सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांना चारा बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नवीन पाच पोलीस चौकींमुळे नागपुरच्या सुरक्षिततेला मिळणार बळ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पाच पोलीस चौकींचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

जी.डी.सी.ए. व सी.एच.एम. परीक्षा २०२४ निकाल घोषित

vishwatmaklokswamivarta

ठाण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, पावसाचा रेड अलर्ट जारी…

vishwatmaklokswamivarta

खारघर परिसरातील दारूबंदीचे निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

गावाच्या समृध्दीसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबबावे- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे- अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta