vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम

 

     जालना, प्रतिनिधी जिल्ह्यातील चालू शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता राज्य सामाईक प्रवेश परिक्षेच्या आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, वि.जा-भ.ज. इ.मा.व. वि.मा.प्र. एस.ई.बी.सी या प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. सदर प्रवर्गातील 11 वी व 12 वी विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थी समितीकडे वेळेत अर्ज सादर करीत नाहित. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक तसेच इतर लाभापासून वंचित राहतात. सदर बाब विचारात घेवून जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.

 जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरीता समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये, यासाठी विहित वेळेत समितीकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वैधता प्रमाणपत्र मिळणेकरीता समितीकडे अर्ज सादर केलेले नाहीत त्यांनी त्वरित अर्ज सादर करावेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रस्ताव सादर केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव www.bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा व त्याची एक प्रत दि. 31 मार्च, 2025 पर्यंत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना या कार्यालयात सादर करावी. ज्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज समितीकडे प्रलंबित आहेत व ज्यांना समितीने ऑनलाईन त्रुटी कळविल्या आहेत, अशा अर्जदारांनी अर्जातील त्रुटींची पुर्तता करण्यासाठी समिती कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क करावा. अर्जदार/पालकांनी उपरोक्त विशेष मोहिमेच्या अनुषंगाने अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी. शैक्षणिक संस्था व्यवस्थापनाने याबाबी आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या/घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन समितीमार्फत करण्यात येत आहे.

****

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोकअदालतीत १६३५ प्रकरणात १८ कोटींहून अधिक रकमेची तडजोड

आपत्ती व्यवस्थापनासाठी कोंकण विभाग सज्ज“शून्य अपघात हे आपले ध्येय”आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी

ह्युमन राइट्स संरक्षण संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन वाळके

डाक जीवन विमा योजनेचे प्रीमिअम भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा..

vishwatmaklokswamivarta

सणासुदीच्या काळात भेसळ रोखण्यासाठीअन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-२०२५ मधील महाराष्ट्र दालनाचे १४ नोव्हेंबरला उद्घाटन सांस्कृतिक कार्यक्रमाचे १५ नोव्हेंबरला आयोजन

vishwatmaklokswamivarta