vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रब्बी हंगाम २०२५ पीकस्पर्धा स्पर्धेत पाच पिकांचा समावेश, जिल्ह्यातील शेतक-यांना सहभागाचे आवाहन

रब्बी हंगाम २०२५ पीकस्पर्धा स्पर्धेत पाच पिकांचा समावेश, जिल्ह्यातील शेतक-यांना सहभागाचे आवाहन

       अकोला, प्रतिनिधी : कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा जाहीर केली असून, अधिकाधिक शेतक-यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छा मनोबलामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यायावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२५ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकासाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

पात्रता निकषःस्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणारया शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. सहभागी लाभार्थ्यांच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रेःविहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२,८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), पीकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा जोडणे आवश्यक. बँक खाते चेक/पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

शेतकरी बांधवांनी दि. ३१ डिसेंबरपूर्वी अर्ज करून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क : पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३००/- राहील व आदिवासी गटासाठी रक्कम १५०/- राहील. बक्षिस स्वरूप : राज्य पातळी (पहिली तीन बक्षीसे- 50 हजार, 40 हजार व 30 हजार), जिल्हा पातळी (10 ह., 7 ह. व 5 हजार), तालुका पातळी (5 ह., 3 ह. व 2 ह.)

  नमूद पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी पिक स्पर्धेत सहभागी व्हावे ,असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. पिकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधूभगीनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी साधावा ,तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ http://krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी .

०००

संबंधित पोस्ट

पारसी टेकडी पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करणार          -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,केशवसृष्टी इरकॉन घनवनचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे नूतनीकरण पूर्ण करून १ मे रोजी लोकार्पणासाठी सज्ज करूया – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ शेंडा पार्कमध्ये सीपीआरसह शासकीय महाविद्यालय व विविध संस्थांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण 34 टक्के भरले महाबळेश्वर महसूल मंडळात 393 मि.मी. पाऊस- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

एस.एस.बी. पूर्वतयारी मोफत प्रशिक्षणासाठी 10 डिसेंबरला मुलाखती …

vishwatmaklokswamivarta

योग दिनानिमित्त योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम व पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार,सर्व ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांचे सहकार्य घेण्यात येणार  — मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले     

स्वच्छ सर्वेक्षणामधील सुपर स्वच्छ शहराचे मानांकन टिकविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज !नागरिकांना स्वच्छताविषयक अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन!