vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

संत रोहिदास 650 वी महोत्सव जयंती नियोजन समितीची धारावीत बैठक संपन्न

 संत रोहिदास 650 वी महोत्सव जयंती नियोजन समितीची धारावीत बैठक संपन्न

[ मुंबई प्रतिनिधी-

६ डिसेंबर 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत झालेल्या चर्मकार समाजातील प्रमुख पदाधिकारी व त्यांनी मांडलेल्या 19 मागणी पत्र बाबत सोबतच येत्या एक फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या 650 व्या जयंती महाराष्ट्रभर संपन्न होण्यासाठी नियोजन झाले आहे

त्याचाच एक भाग म्हणून धारावीतील चर्मकार समाजातील सक्रिय असणाऱ्या प्रतिनिधिक कार्यकर्त्यांची बैठक दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सात वाजता स्थळ श्री गणेश विद्यामंदिर हायस्कूल धारावी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री विजय गोपाळ इंगळे यांनी निमंत्रित करण्यात आले होते श्री इंगळे यांनी पूर्वपार चर्मकार समाज बहुजन समाज आणि संत महात्मे यांचा इतिहास कार्यकर्त्यांसमोर मांडून सध्या सर्व चर्मकार समाजातील घटकांनी एकत्र येऊन सरकार दरबारी आपल्या मागण्या अडचणी आणि बेरजेचे राजकारण करण्याकरिता एकत्र येऊन संघटित ताकद दाखवून येत्या एक फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या 650 व्या जयंती महोत्सवाची जोरदार तयारी व शक्ती प्रदर्शन करून सरकारला दाखवून द्यावे जेणेकरून चर्मकार समाजातील प्रमुख मागण्या अडचणी व अपेक्षा पूर्ण करण्याकरिता सरकारला भाग पाडून दखल घेण्यास आपणाला बेरजेचे राजकारण करावे लागेल याबद्दलची मौलिक मार्गदर्शन त्यांनी केले पण त्यासाठी समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन समाजाला जागृत केले पाहिजे असे आवाहन केले यावेळी सभासदांनी चर्मकार समाजातील ज्येष्ठ समाज कार्यकर्ते श्री दिलीप गाडेकर श्री राम कोकणे श्री नवनाथ शिंदे श्री शकर संनटि श्री सूर्यकांत चौगुले आणि श्री सूर्यकांत इंगळे उपस्थित होते सुरुवातीला सभेच्या सुरुवातीला श्री नवनाथ शिंदे यांनी बैठकीचा उद्देश व नियोजन याबद्दल माहिती दिली त्यानंतर श्री सूर्यकांत चौगुले यांनीही माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे चर्मकार समाजातील अडीअडचणी व प्रश्न 19 समस्या मागणी पत्र सादर केले त्याचे वाचन केले

कार्यक्रमाच्या मध्यावर समाजातील कार्यशील व विविध पुरस्कार प्राप्त केलेल्या श्री सूर्यकांत इंगळे व दिलीप नारद यांचा शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते संत रोहिदास पायी दिंडी मंडळ धारावी यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व चर्मकार समाज घटकांचे आभार मानले यावेळी सविता शेरखाने अलका साबळे गणेश खेडेकर शंकर खिल्लारे यांचेही सहकार्य लाभले राष्ट्रगीताने कार्यक्रमाच्या समारोप करण्यात आला असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक दिलीप गाडेकर यांनी दिली आहे

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेचे जाहीर आवाहन

गणेशोत्सव नियोजन व सार्वत्रिक निवडणूक विषयक कामकाजाचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला आढावा

खारघर परिसरातील दारूबंदीचे निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

जात वैधता प्रमाणपत्रे अनाधिकृत आढळल्यास कायद्यानुसार फौजदारी कारवाई, शिक्षा…

दै. मराठवाडा साथी”चे संपादक सतिश बियाणी यांचे दुःखद निधन छत्रपती संभाजीनगर येथे आज अंत्यसंस्कार

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवरायांविषयी विकृत माहिती देणाऱ्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी