vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आग्रा आणि पानिपत येथे होणार छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक  मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांवर अर्थसंकल्पात तरतूद

आग्रा आणि पानिपत येथे होणार छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक

 मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांवर अर्थसंकल्पात तरतूद

नवी दिल्ली, प्रतिनिधी:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा आणि हरियाणा राज्यातील पानिपत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली होती, आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद केली असल्याची घोषणा, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केली. या दोन्ही ठिकाणी प्रेरणादायी इतिहासाची आठवण करून देणारे स्मारक उभारले जाईल.

  मुघलांच्या नजरकैदेतून छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून सुटका करून निघाले हा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रसंग आहे. ज्या ठिकाणी ते नजरकैदेत होते, ती जागा महाराष्ट्र शासन अधिग्रहित करून तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आग्रा येथे आयोजित कार्यक्रमात केली होती. तसेच यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले होते.

हरियाणा राज्यातील पानिपत येथे झालेल्या युद्धात मराठे शौर्याने लढले होते. ही लढाई 1761 मध्ये अफगाण शासक अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यात झाली. सदाशिवराव भाऊ आणि विश्वेश्वर राव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अतिशय शौर्याने युद्ध केले. पानिपतच्या या युद्धात सदाशिवराव भाऊ जखमी होऊन त्यांना हौतात्म्य आले. स्थानिक आख्यायिकेनुसार, सदाशिवराव भाऊ आणि इतर मराठ्यांच्या रक्तामुळे या ठिकाणचे आंब्याचे झाड काळे झाले होते, त्यामुळे या जागेला काळा आंब असे नाव पडले आहे.

येथे शौर्य स्मारक अधिग्रहणासाठी राज्य शासन सहकार्य करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावर्षी 14 जानेवारीला केली होती. यासाठी राज्यातील राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे समन्वय साधतील असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री.पवार यांनी येथील स्मारक उभारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतुदीची घोषणा केली.

 

0000

संबंधित पोस्ट

विकास लवांडे यांना तात्काळ अटक करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी**वारकरी संप्रदायातील लोकांना ‘घुसखोर’ ठरवण्याचा अधिकार विकास लवांडे आणि राष्ट्रवादीला कुणी दिला ?* – हिंदु जनजागृती समिती

धर्मांतर करून आरक्षणाचा लाभ घेत असलेल्यांवर कारवाई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजामाता जिजाऊ’ बससेवेचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री पवार यांची पडेगाव येथील ‘संपूर्ण वन’ उपक्रमास भेट

आयटीआय बेलापूरमध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त-विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केली पाणीपुरवठा योजनेची पाहणी,पाणीपुरवठा योजनेची प्रलंबित कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर