vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा सक्रिय पाठिंबा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**रिपब्लिकन महिलांनी आंदोलनात अग्रेसर राहावे*

*बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा सक्रिय पाठिंबा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**रिपब्लिकन महिलांनी आंदोलनात अग्रेसर राहावे*

मुंबई प्रतिनिधी ~ महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया येथे ज्ञानप्राप्ती झाली. बुद्धगया येथील बोधिवृक्षाखाली तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली.त्या बुद्धगया मधील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे परमपवित्र जागतिक श्रद्धास्थान आहे.महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्ट चा 1949 चा टेंपल ऍक्ट रद्द करून महाबोधी महाविहार ट्रस्ट मध्ये सर्व सदस्य हे बौद्ध असले पाहिजेत असा बिहार च्या विधानसभेत कायदा केला पाहिजे. यासाठी आपण बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लवकरच भेटणार आहोत.महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशभर बौद्धांचे आंदोलन सुरू आहे.त्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा कृतिशील पाठिंबा आहे.राज्यात रिपब्लिकन पक्षाचे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू असून या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात रिपब्लिकन महिलांनी अग्रेसर व्हावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.

भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथे रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी तर्फे जागतिक महिला दिना निमित्त महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.या महिला मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर ना.रामदास आठवले यांनी महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी ना.रामदास आठवले यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले आणि महिला मेळाव्याचे आयोजक उषाताई रामलू ; रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आणि रियाब्लिकन पक्षाच्या सर्व महिला नेत्या पदाधिकारी उपस्थित होते.

जागी होत आहे गावागावातील नारी मग का येणार नाही तुमची सत्तेमध्ये बारी तुम्हाला करावी लागेल दीक्षाभूमीची वारी

त्या शिवाय पुढे येणार नाही बौद्ध समाजाची नारीअशी कविता सादर करून न.रामदास आठवले यांनी महिलांनी आपल्या जिल्ह्यात तालुक्यात रिपब्लिकन महिला आघाडी चे जन संपर्क कार्यालयसुरूकेलेपाहिजे.जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत.ज्येष्ठ नागरिक;वृध निराधार आणि विधवा महिलाना मदत केली पाहिजे.त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला पाहिजे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात ज्या गरिबाना बँकेत खाते खोलता येत नव्हते त्यांच्या साठी जन धन योजना लागू केली.2014 सालापासून आता पर्यंत 56 कोटी लोकांनी बँक खाती खोलली असून त्यात 56 टक्के महिलांचीखातीआहेत.मुद्रा योजनेतून ही 69 टक्के महिलांनी स्वयंरोजगारउद्योगव्यवसायासाठी कर्ज घेतले आहे.

संबंधित पोस्ट

पर्यटकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ द्वारे ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा-विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांनी स्टॅन्डअप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

विद्याथ्यर्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठीऑनलाईन समुपदेशन करण्याकरिता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये भीषण आग, 100 हून अधिक झोपडपट्ट्या जळून खाक; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अमरावती शहर आणि परिसरातील १४२० कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ, देश सोडण्यावर बंदी; CBI ने जारी केली लुकआउट नोटीस