vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती उत्साहात साजरी*मुरूम येथील श्रीमंत सुभेदार *मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी*सहकार्य करणार**-विधान परिषदेचे सभापती राम शिंदे* 

*श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती उत्साहात साजरी*मुरूम येथील श्रीमंत सुभेदार *मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी*सहकार्य करणार**-विधान परिषदेचे सभापती राम शिंदे*

 

सातारा प्रतिनिधी – श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास दैदीप्यमान असा आहे. मुरूम येथील त्यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली. जिल्हा परिषद सातारा व ग्रामपंचायत मुरूम यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची 332 वी जयंती मुरूम तालुका फलटण येथे साजरी करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे सभापती श्री शिंदे बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन पाटील, आमदार उत्तमराव जानकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार रामहरी रूपवनकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद आदी उपस्थित होते.

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी 30 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार लवकरच कामाला सुरुवात होईल, असे सांगून विधान परिषदेचे सभापती श्री. शिंदे म्हणाले, मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाबरोबर येथे मल्हारसृष्टी उभारण्यासाठी ही प्रयत्न केला जाईल. यासाठी जमीन कमी पडत असल्यास तीही उपलब्ध करून देणे विषयी सांगण्यात येईल. हे जन्मस्थळ युवा पिढीसाठी ऊर्जा व प्रेरणास्त्रोत ठरेल अशा पद्धतीने काम केले जाईल.

 *श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर** *यांच्या जन्मस्थळाच्या* *विकासासाठी पाच कोटींचा निधी दिला जाणार* *-ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे*

वीर पुरुषांचे कार्य युवा पिढी समोर येणे महत्त्वाचे आहे. यासाठी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी ग्रामविकास विभागाकडून पाच कोटींचा निधी तातडीने दिला जाईल, अशी घोषणा ग्रामविकास व पंचायराज मंत्री श्री. गोरे यांनी कार्यक्रमाप्रसंगी केली. ते पुढे म्हणाले, मुरूम गावचा तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव तातडीने सादर करावा याला ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जाईल. या माध्यमातून मुरूम व परिसराचा चांगला विकास केला जाईल. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देशातील मंदिरांबरोबरच संस्कृतीचेही जतन केले असल्याचेही मंत्री श्री गोरे यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितले. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी आमदार फंडातून भरीव निधी दिला जाईल, असे आमदार श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंती कार्यक्रमास स्वरूपराजे खर्डेकर, धैर्यशील कदम, माणिकराव सोनवलकर, लक्ष्मण हाके यांच्यासह मुरूम इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

उत्पादकता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एल.आय.टी. माजी विद्यार्थी संघटनेचा ‘उडान’ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

आसामच्या जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ विमानाला अपघात, ५ जवानांना वीरमरण.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

खेळाडूंच्या जडणघडणीसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसह उत्तम पायाभूत सुविधा देण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद फडणवीस ७५ व्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

कारगिल विजय दिनानिमित्त लोककल्याण भवनात वीरांचा गौरव; अहिल्यानगरच्या कारगिल वीरांचा राज्यस्तरीय सन्मान

शिवाजी विद्यापीठा’चा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ झालाच पाहिजे !* – १० सहस्र हिंदूंची मोर्चाद्वारे ललकारी…