vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

रविवारी कळव्यात रंगणार शिमगोत्सव आणि पालखी नृत्यस्पर्धा*

रविवारी कळव्यात रंगणार शिमगोत्सव आणि पालखी नृत्यस्पर्धा*

 

ठाणे (प्रतिनिधी)- गणेशोत्सवासह शिमगाोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा अत्यंत आत्मियतेचा सण. या सणासाठी ठाणे- मुंबईतील अनेक चाकरमानी आवर्जुन गावी जात असतात. मात्र, ज्यांना काही कारणांनी गावी जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी ‘संघर्ष’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार कळवा येथे शिमगोत्सवासह भव्य पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि.23 मार्च, 2025 रोजी दुपारी ४.०० वाजता कळवा येथील भूमिपुत्र मैदान, खारलँड- कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपारिक प्रकारे साजरा करण्यात येणार आहे. या प्रसंगी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेवून आणण्यात येणार आहे. या पालखी उत्सवानिमित्त पालखी नृत्य स्पर्धेचेही आयोजन केले असून, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यांमधील अनेक नामवंत पालखी नृत्य संघ सहभागी होणार आहेत. या निमित्ताने कोकणातील पालखी उत्सव आणि देखाव्यांसह पारंपारिक पालखी नृत्य हे ठाणे-मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच रत्नागिरीतील आंबेशेत येथील महिला पथक पालखी नृत्य सादर करणार आहे.

या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास एक लाख 51 हजार रुपये व आकर्षक चषक; द्वितीय विजेत्यास एक लाख 1 हजार रुपये व आकर्षक चषक; तृतीय विजेत्या संघाला 51 हजार रुपये व आकर्षक चषक तर सर्व सहभागी संघाना प्रत्येकी 25 हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी अरूण नागवेकर (वांद्री,ता. संगमेश्वर) ९४०५०८००८५ आणि अरविंद मोरे ९८१९०९५०४७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

कारकिर्दीच्या यशस्वीतेत टीम वर्क महत्वाचे-मुख्य सचिव राजेश कुमार

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिनानिमित्त बॅंक ऑफ महाराष्ट्र,ठाणे अंचल कार्यालयातर्फे महिला मेळावा संपन्नमेळाव्यामध्ये एकूण 52 बचतगटांना 2 कोटी 65 लाख रुपयांचे कर्जवाटप..

धनगर समाज आरक्षण मोर्चानिमित्त वाहतूक मार्गात बदल ..

vishwatmaklokswamivarta

रोटरी इंटरनॅशनलचे दक्षिण कोरियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुप्रसिद्ध नेते संगकू युन यांचा मुंबई दौरा संपन्न, भारत देशात समाजसेवेसाठी अनेक संधी…

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार-प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी१ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

vishwatmaklokswamivarta

रस्ते सुरक्षा अभियान विशेष लेख-

vishwatmaklokswamivarta