vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

ग्रामिण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दिव्यांगांसाठीविशेष शिबिरे आयोजीत करा- जिल्हाधिकारी स्वामी

ग्रामिण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दिव्यांगांसाठीविशेष शिबिरे आयोजीत करा- जिल्हाधिकारी स्वामी

 

छत्रपती प्रतिनिधी- सुकर जीवनासाठी दिव्यांगांना सर्व शासकीय विभागाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावयाचे असून त्यासाठी दिव्यांगांची तपासणी व नोंदणी ग्रामिण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये येथे विशेष शिबिरे आयोजीत करुन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले.

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.बी, चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, आश्विनी लाटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, महानगरपालिकेचे समाज कल्याण उपआयुक्त लकीचंद चव्हाण, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे ए.के.शेख, जिल्हा आरोग्य विभागाचे प्रतिनिधी डॉ. महेश लड्डा, बार्टी कार्यालयाचे प्रतिनिधी योगेश सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी चौरे, महाज्योती कार्यालयाचे चंद्रशेखर वडले, यांच्यासह समितीचे सदस्य या बैठकीस उपस्थित होते.

 यावेळी आरोग्य तपासणीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यात ग्रामिण रुग्णालय कन्नड, पाचोड, पैठण, उपजिल्हा रुग्णालय गंगापूर, वैजापूर येथे शुक्रवार दि.२८ मार्च व शुक्रवार दि.४ एप्रिल रोजी शिबिरे होतील. उपजिल्हा रुग्णालय सोयग्व, सिल्लोड येथे २७ मार्च ३ एप्रिल , जिल्हा रुग्णालय व फुलंब्री येथे सोमवार दि.२४ मार्च, बुधवार दि.२६ मार्च, २ एप्रिल , शुक्रवार दि.२८ मर्च व ४ एप्रिल रोजी तपासणी होईल. हीशिबिरे सकाळी ९ ते दुपारी एक या वेळात होतील. या शिबिरांमध्ये तपासणीसाठी येतांना आधार कार्ड, दिव्यांगत्व प्रमाणपत्र असल्यास ते तसेच अन्य आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. त्यावरुन दिव्यांगांना आवश्यक असलेल्या योजना ठरवून त्यांना लाभ देण्याचे निश्चित केले जाईल.

०००००

संबंधित पोस्ट

एच आय व्ही संसर्गित रूग्णांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे,जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या बैठकीत निर्देश

ठाणे जिल्ह्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून ४४९० नागरिकांची तपासणी; २३७ संशयित रुग्णांची नोंद…

रक्तदान शिबिर मालिकेत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ⁠112 पिशव्या रक्त संकलित- दोन शिबिरातून एकूण 213 पिशव्या रक्त संकलन

vishwatmaklokswamivarta

3.8 किलोच्या फुटबॉल एवढी आकाराची होती पोटात कॅन्सर ची गाठ !! कॅन्सर सदृश्य गाठ काढण्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालय मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया -प्रसिद्ध प्राध्यापिका सर्जन स्त्रीरोग विशेषज्ञ डॉक्टर राजश्री दयानंद कटके 

vishwatmaklokswamivarta

रुग्णालय अंगीकृत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना

vishwatmaklokswamivarta

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त बुलढाण्यात ‘नेत्रदान-जीवनदान’ जनजागृती मोहीम