vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पैठण येथे नाथषष्ठी निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजा…

पैठण येथे नाथषष्ठी निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजा…

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी

 नाथषष्ठी निमित्त पैठण येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते सपत्निक विधीवत पूजा करण्यात आली. आ. विलास भुमरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसिलदार दत्ता भारस्कर आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी आलेल्या दिंड्यांमध्ये सहभागी होऊन वारकऱ्यांच्या भेटी घेऊन विचारपूस केली. आज सकाळी सात वाजता ही पूजा करण्यात आली,
 नाथषष्ठी यात्रौत्सवासाठी यंदा एकुण ६२७ पायी दिंड्या पैठण व परिसरात दाखल झाल्या आहेत. सुमारे लाखभर वारकरी मुक्कामी आहेत. पैठण नगर परिषदेच्या वतीने या सर्व दिंड्यांच्या नोंदी करुन क्रमांकाचे बिल्ले दिले जातात. त्यांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून ३९ तर नाशिक येथून ४४ दिंड्या पायी दाखल झल्या आहेत. पुणे २०, वाशीम ३, अकोला ५, यवतमाळ २, जळगाव १०, हिंगोली ३, धुळे १, सोलापूर १०, नांदेड १, परभणी २४, जालना ८९, धाराशिव ६, अहिल्यानगर ११९, बीड ९० व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १२२ दिंड्यांचा समावेश आहे. यात्रा मैदानासह वाळवंट व इतरत्र फिरती शौचालयांच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. पिण्याचे पाणी, आरोग्य तपासणी पथके, स्वच्छता पथके, वाहतुक नियंत्रक पथके आदी तैनात आहेत. तसेच पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
०००००

संबंधित पोस्ट

पुरी’ गावच्या महिला बचत गटांची पंढरीची वाटघोंगटा उत्पादनातून आर्थिक कमाई आणि पुण्य संचितही

रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती करा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

vishwatmaklokswamivarta

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन सतर्क ; जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व यंत्रणांना निर्देश

छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली जायकवाडी समांतर पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली देशाचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांची सदिच्छा भेट

आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरा जपा – आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे आवाहन