vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वाडा-भिवंडी रस्त्याचे काम गतीने करणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

वाडा-भिवंडी रस्त्याचे काम गतीने करणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

मुंबई, प्रतिनिधी -वाडा – भिवंडी रस्त्याचे काम गतीने करून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाईल असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत सांगितले.या संदर्भात सदस्य शांताराम मोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती,या लक्षवेधीच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री श्री. भोसले यांनी सांगितले, या रस्त्याच्या कामाकरता आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची उपलब्धता आणि रेडी मिक्स काँक्रिट प्लांट उभारण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. वाडा ते भिवंडी या रस्त्याच्या ५५.६१० कि.मी लांबी पैकी डाव्या बाजूच्या मार्गिकेच्या सर्वसाधारणपणे ८ किमी लांबीच काम प्रगतीत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक सुरळीत राहील याची दक्षता घेण्यात आली आहे. या रस्त्याचे प्रगतीत असलेले ८ किमी लांबीतील काम पावसाळ्यापूर्वी करण्याचे नियोजन आहे. तर मनोर वाडा-भिवंडी या रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदराला दिल्या असल्याचेही मंत्री श्री. भोसले यांनी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून  “सांगली पॅटर्न” अंतर्गत तृतीयपंथीयांसाठी रोजगार मेळावा

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ चळवळ !राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी पोलीस-प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांना निवेदने

शेतकर्‍यांच्या प्रश्नी शिवसेनेचा आवाज दणाणला…शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्त करून अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना भरीव मदत द्या –जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

जिल्ह्यात ‘नशामुक्त भारत अभियान’जाणीव जागृतीसाठी तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा

विशेष लेख-स्मार्ट व इंटेलिजंट गावांकडे महाराष्ट्राची वाटचाल‘सातनवरी’ ठरले देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव…

गुंठेवारी मालमत्ताना पन्नास टक्के सुट व सवलत देऊन नियमित करून देण्यात यावी,औरंगाबाद शहर सुधार समितीच्या वतीने मनपा आयुक्त सचिवला निवेदन.