vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

साखर गावातील घटनेत पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही- गृह राज्यमंत्री डॉ पंकज भोयर

साखर गावातील घटनेत पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही- गृह राज्यमंत्री डॉ पंकज भोयर

मुंबई, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात राजगड मधील साखर या गावी जमावाने केलेल्या दगडफेक घटनेबाबत भारतीय न्याय संहिता आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियमनच्या विविध कलमांतर्गत ३२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांवर दगडफेक प्रकरणी कुणालाही सोडले जाणार नसल्याचा इशारा गृहे (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.

साखर गावातील या प्रकाराबाबत सदस्य महेश लांडगे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

या सूचनेच्या उत्तरात माहिती देताना राज्यमंत्री भोयर म्हणाले, किरकिटवाडी फाटा येथे राहणाऱ्या मुलाने औरंगजेबविषयी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामला ठेवलेल्या स्टेटसचे स्क्रीन शॉट राजगड तालुक्यातील व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले होते. याप्रकरणी काही संघटनांनी वेल्हे पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले. त्यानुसार या मुलाच्या पालकाकडून पोस्ट चुकीची असल्याचे मुलास सांगून ही पोस्ट मुलाने डिलीट केली.

साखर गावात बलिदान मास कार्यक्रमादरम्यान जमावाने प्रक्षोभक भाषणे दिली. याप्रकरणी पोलिसांनी विरोध केला असता जमावाने पोलिसांवर दगडफेक करून शासकीय वाहनाचे नुकसान केले. यामध्ये दोन पोलीस अंमलदार जखमी झाले. पोलिसांनी वेळीच अटकाव करून परिस्थिती नियंत्रणात आणून शांतता प्रस्थापित केली, असेही गृहराज्यमंत्री डॉ . पंकज भोयर यांनी सांगितले.

0000000

संबंधित पोस्ट

नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सदिच्छा भेट

vishwatmaklokswamivarta

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन

योग जीवनाचा अविभाज्य घटक बनवा – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेला वेग*शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

कंपनीला ६० दिवसांच्या मुदतीत सौर कृषी पंप लावणे बंधनकारक- ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे

बुलढाणा तालुक्यातील अवसायनातील 103 संस्थांची नोंदणी रद्द होणार; आक्षेप नोंदविण्याचे सहायक निबंधकाचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta