vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

संकल्प सिद्धीसाठी शरीरस्वास्थ्य अत्यावश्यक जिल्हाधिकारी अशोक काकडे

संकल्प सिद्धीसाठी शरीरस्वास्थ्य अत्यावश्यक जिल्हाधिकारी अशोक काकडे

 

 सांगली, प्रतिनिधी: बळकट समाज व्यवस्थेसाठी शारीरिक व मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. संकल्प सिद्धीसाठी शरीरस्वास्थ्य हे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.

  एकात्मिक आरोग्य अभियान अंतर्गत सांगली येथील संजयनगर शहरी आरोग्य केंद्र क्र. 6 येथे मोफत आरोग्य शिबीर उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था-मुंबई चे सहसंचालक डॉ. राहुल जाधव, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र चौगुले आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, बऱ्याचदा महिला, गोरगरीब नागरिक हे आजार खूप दिवस अंगावर काढतात, त्यामुळे ते आजार पुढील काळात गंभीर स्वरुप प्राप्त करतात. त्यामुळे आपल्या भागामध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या आरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांचे निदान करण्यात येत आहे व त्यामध्ये उपचार किंवा शस्त्रक्रियेची गरज भासल्यास संदर्भ सेवा पुरविली जाणार आहे. याचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी या अभियानांतर्गत सेवा पुरवण्यात येणाऱ्या अतिजोखिमीचा असणारा समुदाय यांचे समुपदेशन, संशयित क्षयरोग रुग्ण तपासणी, एच. आय. व्ही. आणि गुप्तरोग तपासणी व उपचार, कावीळ, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अॅनिमिया निदान व उपचार तसेच इतर अत्यावश्यक गरजेनुरुप तपासणी बाबत लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन केले. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सदर सेवा सर्व शिबिरार्थीना देण्याबाबत सतर्क राहावे, अशा सूचना दिल्या.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष हे नेहमीच एच.आय.व्ही एड्स बाबत जनजागृती, तपासणी व उपचार सेवा देण्यामध्ये अग्रेसर असते. या शिबिराच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आरोग्य विभाग रुग्णसेवेसी कटिबध्द राहून तपासणी व उपचार सेवा दिली.

दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत यांनी केले. कार्यक्रमास पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली कडील विविध विभागांचे पथक, एचआयव्ही / एड्स क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था व रुग्ण सेवा घेण्याकरिता आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम मोहीम शनिवारपासून,पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कळंबीला जिल्हास्तरीय कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे आजारांचे पुनर्विलोकन, अर्थसहाय्याची नव्याने निश्चिती, रुग्णालय संलग्नीकरण निकष ठरविण्याकरिता समिती

vishwatmaklokswamivarta

जागतिक ऑटिझम दिनानिमित्त लातूर जिल्हा परिषदेत जनजागृती

vishwatmaklokswamivarta

सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालय येथे जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन उत्साहात साजरा

ओटी भरण कार्यक्रमानिमित्त वाई तालुक्यातील 925 गरोदर मातांची आरोग्य तपासणी

vishwatmaklokswamivarta

थॅलेसेमिया मुक्तीसाठी विवाहपूर्व तपासणी काळाची गरज : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे ​ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे ‘थॅलेसेमिया सप्ताह’ कार्यक्रमाचे उद्घाटन व शपथ ग्रहण