vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बुलढाण्यात “रन फॉर फॉरेस्ट” मॅरेथॉनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश 600 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग ..

बुलढाण्यात “रन फॉर फॉरेस्ट” मॅरेथॉनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश 600 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग ..

 

बुलढाणा, प्रतिनिधी : जागतिक वन दिनानिमित्त बुलढाणा प्रादेशिक वनविभागाच्या वतीने “रन फॉर फॉरेस्ट 1.0” या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत झाडे लावण्याची आणि त्यांचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित केली.

 जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “एक दिवस धावून पर्यावरण संवर्धन करता येणार नाही, तर हे दैनंदिन सवयीत आणले पाहिजे. झाडे लावून त्यांचे संगोपन करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाने यात सहभागी व्हायला हवे.” त्यांनी विद्यार्थ्यांना आणि युवकांना वृक्षारोपण आणि संवर्धनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

1000 आंब्याची झाडे वाटप ,कार्यक्रमाच्या वेळी वनविभागाच्या वतीने 1000 आंब्याची झाडे वितरित करण्यात आली. उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी “फॉरेस्ट आणि फूड” या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले. जंगल टिकवण्यासाठी नागरिकांनी वन विभागासोबत हात मिळवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या मॅरेथॉनमध्ये 600 हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या धावपटूंना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

विजेते स्पर्धक , १० किमी मॅरेथॉन – प्रथम: जयेश विलास पाटील, व्दितीय: वैभव पुरुषोत्तम बरडे, तृतीय: जाहीन मदे खा पठाण. प्रोत्साहनपर पारितोषिक प्रणाली शेगोकर यांनी पटकावले.

५ किमी मॅरेथॉन – प्रथम: गौरी वसंत राठोड, व्दितीय: लक्ष्मी महेश शेळके, तृतीय: दिव्या मोहनलाल जाधव.

३ किमी मॅरेथॉन – प्रथम: नेहा सुखदेव जाधव, व्दितीय: प्रगती प्रमोद राऊत, तृतीय: मृणाल संजय पडोळसे.

 अनेक मान्यवरांची उपस्थिती , या कार्यक्रमाला विभागीय वन अधिकारी विपुल राठोड, जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी डॉ.पराग नवलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले, सहायक वनसंरक्षक अश्विनी आपेट, तसेच जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 या मॅरेथॉनमध्ये बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक नियंत्रण व्यवस्था ठेवली होती. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन राऊत यांनी मानले.

000

संबंधित पोस्ट

आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य-उपमुख्यमंत्री अजित पवार औंध येथे बहुउद्देशीय दंत रुग्णालय, संशोधन केंद्र स्थापनेबाबत सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तर वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करणार आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta

संगमनेर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीचे काम लवकरच मार्गी लावणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणावर भर-दादाजी भुसे शिक्षण विभागाच्या शासकीय शाळांचा सर्वंकष आढावा

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर क्षयमुक्त कोल्हापूर’ या संकल्पनेतून संपूर्ण जिल्हा क्षयमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवून अभियान यशस्वी करा – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे