vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महसूल विभागाची धडक कारवाई; खडकपुर्णा जलाशयात आठ बोटी केल्या नष्ट…

महसूल विभागाची धडक कारवाई; खडकपुर्णा जलाशयात आठ बोटी केल्या नष्ट…

बुलडाणा, प्रतिनिधी: देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणामध्ये रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेत महसूल व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाने दि. 24 मार्च रोजी मोठी कारवाई करत आठ बोटी नष्ट केल्या. तसेच अशा प्रकारच्या खडकपूर्णा धरणामध्ये अवैध उपसा करणाऱ्यावर नियमितपणे कारवाई करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी संबधिताना दिले.

खडकपूर्णा धरणाच्या जलाशयामध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेण्यासाठी महसूल विभाग व जिल्हा स्तरीय शोध व बचाव पथकाव्दारे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेतर्गत दुपारी 4 वाजताच्या दरम्यान मौजे गारखेड व मंडपगाव शिवेजवळ शिवारात अवैध रेती उपसा करणाऱ्या चार फायबर बोटी व चार इंजिन बोटी अशा एकूण आठ बोटी पकडण्यात आल्या. त्यामधील मजूर पळून गेल्याने बोटी कोणाच्या आहेत, यांची माहिती मिळू शकली नाही. सदर आठ बोटी धरणाच्या किनाऱ्यावर स्फोटके लावून नष्ट करण्यात आल्या. सदर शोध मोहिम राबविताना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. अवैध उपसा करणाऱ्या बोटी बेशरमाच्या झाडीमध्ये लपविण्यात आल्या होत्या. जिलेटिनच्या साहाय्याने बोटी नष्ट करण्याची प्रक्रिया रात्री 8 वाजेपर्यंत राबविण्यात आली.

सदर कारवाई जिल्हधिकारी डॉ. किरण पाटील व उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, सायली जाधव, मंडळ अधिकारी विजय हिरवे, काशिनाथ ईप्पर, रामदास मांटे, प्रल्हाद केदार, ग्राम महसूल अधिकारी विलास नागरे, परमेश्वर बुरकुल, संजय हंडे, सुरेश डोईफोडे, मधुकर उदार, संजय बरांडे, राजू तागवाले, आकाश खरात, तेजस शेटे, कृष्णा खरात, खडकपुर्णा प्रकल्प उपविभागाचे अधिकारी एस. जे. तल्हार, शोध व बचाव पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तरासिंग पवार, पोलीस कॉन्स्टेबल गुलाबसिंग राजपूत, संदीप पाटील, सलीम बरडे, प्रदीप सोनुने आणि पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरक्षिक नारायण गीते आदी उपस्थित होते. 00000

संबंधित पोस्ट

मेळघाट विकासासाठी प्रशासनातील समन्वय वाढवावा-मंत्री डॉ. अशोक उईके

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे निर्जलीकरण प्रशिक्षण…

दर महिन्याला रोजगार मेळाव्याद्वारे जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रोजगार मेळाव्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेची थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी ढोलताशे मोहीम**मालमत्ताकर थकबाकीदार नवी मुंबई महानगरपालिकेच्या रडारवर*  *३१ मार्च २०२५ पूर्वी कर भरण्याचे मालमत्ताकर थकबाकीदारांना आवाहन* 

पैठण तालुक्याचे विविध विकास कामाचा आढावा.सर्वसामान्यांच्या तक्रारी निवारणाबरोबरच विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

बालविवाह रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका महत्वाची-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta