vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

आदिवासी सुशिक्षित उमेदवारांना विनामुल्य स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण

आदिवासी सुशिक्षित उमेदवारांना विनामुल्य स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण

 

बुलडाणा, प्रतिनिधी आदिवासी उमेदवारांकरीता परतवाडा (जि. अमरावती) येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राकडून विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेची विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी दि. 27 मार्च 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशिक्षण कालावधी दि. 1 एप्रिल ते 15 जुलै 2025 पर्यंत असा साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रूपये विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येत

प्रशिक्षणासाठी पात्रता : उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा. किमान वय 18 ते ३० चे दरम्यान असावे, उमेदवार किमान एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण असावा, रोजगार मार्गदर्शन केंद्र कार्यालयात नोंदणी केलेली असावा.आवश्यक कागदपत्र : शाळा सोडल्याचा दाखला, उपविभागीय अधिकारीयांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, एस.एस.सी. उत्तीर्णची गुणपत्रिका, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयात नोंदणी प्रमाणपत्र व उमेदवाराचा पासपोर्ट फोटो.

अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी अर्ज आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपुर कॅम्प, परतवाडा. ता अचलपूर. जि.अमरावती या ठिकाणी उमेदवार निवडीसाठी 28 मार्च रोजी 12 वाजता मुलाखत होणार आहे. यासाठी मुलाखतीस मुळ कागदपत्रासह उमेदवारांनी उपस्थित राहावे. तसेच निवड यादी त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता कार्यालयीन सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. अधिक माहितीसाठी 07223-221205 किंवा 7709432024 या क्रमांकावर संपर्क साधावा. 000000000

संबंधित पोस्ट

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास शासनाचे प्रथम प्राधान्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • महिलांच्या शाश्वत उपजीविकेसाठी ‘उमेद–एमएसआरएलएम’ व ‘राह फाउंडेशन’चा सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

कर्जत तालुक्यातील जुना दगडी पूल वाहतुकीस तात्काळ बंदी

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक -भारताच्या विजयासाठी गोव्यातील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘शतचंडी यज्ञ’! – सनातन संस्था

आगामी काळात ‘महाक्राईमओएस’ चा राज्यभर होणार वापर; २ कोटी रुपयांचा निधी मंजूर ‘एआय’ आधारित गुन्हे तपासाच्या प्रायोगिक प्रकल्पाला मिळाले आर्थिक बळ

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गतजालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 11 प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती आदेशांचे वितरण

लातूरकरांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य ‘मिनी सरस व जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन’