vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी 5 एप्रिल अर्जाची मुदत…

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी 5 एप्रिल अर्जाची मुदत…

 

        सांगली, प्रतिनिधी : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती आणि संस्था यांनी दि. 5 एप्रिल 2025 पूर्वी 4 प्रतीमध्ये सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली कार्यालयामध्ये अर्ज आणि संबंधित कागदपत्रे सादर करावीत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सांगलीच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 राज्यातील वीरशैव-लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाज सेवकांना आणि यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना, प्रतिवर्षी वैशाख शुध्द (अक्षय तृतीया) या दिवशी महात्मा बसवेश्वर यांच्या नावे एक व्यक्ती आणि एका संस्थेला महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार जाहीर केला जाणार आहे. हा पुरस्कार वीरशैव-लिंगायत समाजाकरिता सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व आर्थिकदृष्ट्या कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक तसेच सामाजिक संस्था यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी पुरुष वयोमर्यादा किमान 50 वर्षे तर महिला 40 वर्षे असून सामाजिक संस्थेसाठी या क्षेत्रातील किमान 10 वर्षे कार्य असा निकष असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

राज्यासह मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरूच..

vishwatmaklokswamivarta

इमर्जन्सी रिस्पॉन्स सॅनिटेशन युनिट’ वाहनाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण- मलवाहिनी स्वच्छतेदरम्यान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला मिळणार बळ..

बंद कालावधीत औषध पुरवठ्याकरिता अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज

एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप २०२६ साठी कृषी विभागाचे आवाहन

नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात 35 ठिकाणी रविवारी विशेष स्वच्छता, सुशोभिकरण मोहीम..

कायद्याची जाण निर्माण करण्यासाठी,सामाजिक न्यायासाठी महाशिबिर उपयुक्त ठरेल- न्यायमूर्ती भारती डांगरे ,इस्लामपूरमध्ये विधी साक्षरता, शासकीय योजनांचे महाशिबिर उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta