vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातअनधिकृत भूखंड, बांधकाम नियमित होणार- महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडेसर्वेक्षण पथकास सहकार्य करण्याबाबत महानगर आयुक्तांच्या तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचना…

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातअनधिकृत भूखंड, बांधकाम नियमित होणार- महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडेसर्वेक्षण पथकास सहकार्य करण्याबाबत महानगर आयुक्तांच्या तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचना…

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी

– छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात अनाधिकृत भूखंड तसेच बांधकामाबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. महानगर क्षेत्रात सर्वेक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी यापूर्वी केले होते आता तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच संबंधित अधिकारी तसेच कर्मचारी यांनी सर्वेक्षण पथकास आवश्यक सहकार्य करण्याबाबत सूचना आज दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आज छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील विना परवानगी भूखंड तसेच बांधकाम सर्वेक्षणाबाबत श्री. गावडे यांनी आज प्राधिकरण क्षेत्रातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, उप अधीक्षक भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, गुंठेवारी कक्ष प्रमुख (म.न.पा.), व सबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला, यावेळी महानगर नियोजनकार हर्षल बावीस्कर, सह महानगर नियोजनकार रविंद्र जायभाये, अनधिकृत बांधकाम विभाग प्रमुख सुनंदा पारवे, उप महानगर नियोजनकार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महानगर आयुक्त श्री.गावडे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात अनाधिकृत भूखंड व विनापरवाना बांधकामाबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने महसूल विभाग तसेच पंचायत विभागाने नागरिकांमध्ये जनजागृतीच्या अनुषंगाने लोकसंपर्कातील संबंधीत कर्मचारी जसे की तलाठी, ग्रामसेवक यांना सूचना देण्याबाबत सांगितले. तसेच सर्वेक्षण करताना आवश्यक कागदपत्रे सर्वेक्षकांना पुरविण्यात यावे, असे निर्देश दिले

प्राधिकरण क्षेत्रामध्ये गुंठेवारी नियमांतर्गत छोट्या क्षेत्राचे भूखंड तसेच बांधकामे नियमित करण्याच्या अनुषंगाने संबंधित भूमी अभिलेख विभागाने मोजणी करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त श्री गावडे यांनी दिल्या आहेत. मोठ्या क्षेत्राच्या भूखंडामध्ये विनापरवावगी बांधकामे असल्यास त्याचे नियमितीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने त्याबाबतची मोजणी करण्याच्या सूचनही त्यांनी दिल्या.

निबंधक कार्यालयांनी लोकहितास्तव आवश्यक त्या परवानग्या पाहून दस्ताच्या कार्यवाहीबाबत आवश्यक निर्णय घेण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.

अनधिकृत भूखंड तसेच बांधकाम नियमित झाले तर गरजूंना या मालमत्तेवर बॅंकेकडून कर्ज मिळणेही सुलभ होणार आहे. तसेच ज्यांना सदर मालमत्तेची विक्री करावयाची असल्यास विक्री करणेही सुलभ होईल. तसेच नियमित झालेल्या मालमत्तांचे मुल्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने याबाबत जनजागृती करण्याबाबत महानगर आयुक्त श्री. गावडे यांनी सांगितले आहे.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ‘युनिटी पदयात्रा’ उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

शारीरिक, मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक – ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे- जिल्हा परिषदेने योग दिनी साधला विश्वविक्रमी भक्तियोग- चितळे डेअरी आणि विश्व योगदर्शन केंद्र यांच्यासह संयुक्त उपक्रम- ⁠जवळपास साडेपाच लाख योगप्रेमींचा सहभाग- ⁠एकाच वेळी तीन विश्वविक्रमांना गवसणी- ⁠वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद- ग्रामीण भागातून भरभरून प्रतिसाद…

भगवानगड विकासासाठी वनविभागाची ४ हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकारची मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार

दृष्टिहीन विद्यार्थिनी, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनी, मुंबई महानगर पालिकेअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी तसेच पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना राखी बांधली

ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि संचालक शारीरिक शिक्षण पदे शिक्षक संवर्गात समावेशासाठी प्रस्ताव तयार करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद लक्षवेधी :प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्यांवर कोणताही अन्याय होणार नाही- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील