vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईतील गृहसंकुल पुनर्विकासासाठी महाप्रीत – एनबीसीसी यांच्यात सामंजस्य करार..

मुंबईतील गृहसंकुल पुनर्विकासासाठी महाप्रीत – एनबीसीसी यांच्यात सामंजस्य करार..

 

         मुंबई, प्रतिनिधी : महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रीत) व एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड, नवी दिल्ली गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारची नवरत्न कंपनी यामध्ये विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्याकरिता मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला.नबीसीसी (इंडिया) लिमिटेड या कंपनीची मोठे गृहनिर्माण प्रकल्प, आयटी इमारतींचे बांधकाम तसेच स्वदेशात आणि परदेशात पायाभूत सुविधा प्रकल्पांची संकल्पना व अंमलबजावणी करणे आणि अशा प्रकल्पांना निधी देण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे

   ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, भिवंडी महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिका या प्रमुख प्रकल्पांमध्ये पीएमएवाय आणि परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांची अंमलबजावणी महाप्रीत करत आहे. मुंबईत सुमारे 56 एसआरए प्रकल्प महाप्रित राबविणार आहे. एमएमआर आणि विशेषतः मुंबई शहरातील विविध खाजगी सहकारी गृहसंकुल संस्थांनी त्यांच्या परिसराचा पुनर्विकासासाठी महाप्रितसोबत चर्चा केली आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत मुंबई शहरातील गृहसंकुलाची गरज पूर्ण करण्याकरिता महाप्रित आणि एनबीसीसी या कंपन्या सहकार्य करणार आहेत.

   महाप्रीत ईएसजी अनुपालन, स्वच्छ आणि हरित ऊर्जा निकषांचा अवलंब, कचरा पुनर्वापर, डीकार्बोनाइज्ड साहित्य, नवीनतम आणि पर्यावरणपुरक लवचिक बांधकाम तंत्रज्ञान, राष्ट्रीय पर्यावरणपूरक मानके, राज्यातील दुर्बल घटकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि प्रकल्प देखरेखीसाठी आंतरराष्ट्रीय मानके यावर लक्ष केंद्रित करीत आहे. प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरिता महाप्रित कंपनी अग्रस्थानी आहे. तसेच महाप्रित आणि एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडची तज्ज्ञता व कौशल्यामुळे होणारे फायदे लक्षात घेता, दोन्ही सरकारी संस्थांनी समान हितांच्या प्रकल्पांवर पीएमसी अथवा ईपीसी तत्वावर प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे

  यावेळी महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी म्हणाले, एनबीसीसी आणि महाप्रित यांच्यातील सहकार्यामुळे पुनर्विकास कार्य करण्यास मदत होईल व गृहसंकुलांना पुनर्विकास करण्याची संधी प्राप्त होईल. तसेच केंद्र सरकारच्या संस्थांना विकासकांची निवड करण्याचे पर्याय उपलब्ध होत असल्यामुळे, पुनर्विकासांची कामे राज्य शासनाच्या नियमानुसार करण्यात येईल.

    एनबीसीसीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक के. पी. महादेवस्वामी म्हणाले, एनबीसीसी (इंडिया) मुंबई आणि महाप्रित यांच्या संयुक्त सहकार्यामुळे मुंबई व मुंबई परिसरातील पुनर्विकासांची प्रकल्प राबविण्यात येतील. तसेच अशाच प्रकारचे प्रकल्प नवी दिल्ली व इतर राज्यांमध्ये संयुक्तपणे राबविण्यात येतील.

  यावेळी महाप्रीतचे संचालक पुरुषोत्तम जाधव, कार्यकारी संचालक सुभाष नागे, प्रकल्प संचालक पी. आर.के. मुर्ती, कार्यकारी संचालक सुनील पोटे तसेच एनबीसीसी (इंडिया) नवी दिल्लीचे कार्यकारी संचालक प्रदिप शर्मा, कार्यकारी संचालक प्रविण डोईफोडे व इतर अधिकारी उपस्थित

0000

संबंधित पोस्ट

अहमदपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – सहकारमंत्री बाबासाहेब पाटील* अग्निशमन अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे लोकार्पण* शहराच्या वैभवात भर घालणारे व्यापारी संकुल उभारण्याचे नियोजन* न्यायालय इमारत आणि भूमिगत गटार योजनेसाठी पाठपुरावा

मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या प्रमुख अभियंता पदी श्री विनायक कृष्णा भट व सहाय्यक कामगार अधिकारी पदी श्रीमती इंगळे  यांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

तुंग, आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याहस्ते उद्‌घाटन- शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मानले प्रशासनाचे आभार

vishwatmaklokswamivarta

आदर्शवत समन्वयातून कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वी पूरनियंत्रण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (#बार्टी) तर्फे राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर – 

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीमुळे रिपब्लिकन पक्षाचा 68 व्या वर्धापन दिनाचा दिनांक 3ऑक्टोबर चा कार्यक्रम रद्द -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**रिपब्लिकन पक्षाचा यंदाचा 68 वा वर्धापन दिन आता दिनांक 3 नोव्हेंबर रोजी साजरा होणार*