vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगेयांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”आरोग्य व्यवस्था पाहून व्यक्त केले समाधान

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगेयांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”आरोग्य व्यवस्था पाहून व्यक्त केले समाधान

ठाणे,द प्रतिनिधी:- शासनाच्या ‘मिशन 100 डेज्’ अंतर्गत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून तेथील उपलब्ध औषधसाठा, स्वच्छता तसेच इतर सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सोयीसुविधांची खातरजमा करण्यासाठी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून स्वत:ची वैद्यकीय तपासणी करून घेतली.

यावेळी त्यांनी आपली ईसीजी चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट अवघ्या 3 मिनिटात प्राप्त झाला. या घटनेमुळे प्रशासनातर्फे देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांच्या तत्परतेबद्दल तेथील नागरिकांनी आरोग्य विभागाचे आणि जिल्ह्याच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे दिलेल्या अचानक भेटीचे कौतुक केले.

याप्रसंगी उपस्थित आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, आपल्या हातून जनतेची सेवा घडत राहावी. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आपल्या आरोग्य सोयीसुविधांचा लाभ मिळायला हवा. यासाठी सर्वांनी एकजुटीने व प्रामाणिकपणे आपली कर्तव्यपूर्ती करावी.

या भेटीप्रसंगी शहापूर तहसिलदार परमेश्वर कासुले, शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

क्षयरोगमुक्त जिल्ह्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा -मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात

जिल्हा रुग्णालयात कर्करोगाची पहिलीच अ त्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी ‘मॅलिग्नंट फायलॉइड्स ट्यूमर’वर यशस्वी उपचार;

vishwatmaklokswamivarta

कामोठे येथे जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रम संपन्न

आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे अतिजोखमीच्या मातेचे वाचले प्राण; अचलपूरच्या मडकी येथील आरोग्य चमूची कामगिरी

नेत्रदान पंधरवड्यानिमित्त जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानगुरुवारी रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन

vishwatmaklokswamivarta