vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

इलेक्ट्रीक वाहन रॅलीतून केली जनजागृतीअर्थिक बचत व पर्यावरण संवर्धनासाठी अपारंपारिकऊर्जा वापरास चालना द्यावी- अपारंपारिक ऊर्जा मंत्री सावे

इलेक्ट्रीक वाहन रॅलीतून केली जनजागृतीअर्थिक बचत व पर्यावरण संवर्धनासाठी अपारंपारिकऊर्जा वापरास चालना द्यावी- अपारंपारिक ऊर्जा मंत्री सावे

 

राज्य प्रतिनिधी प्रतिनिधी-देशाच्या ऊर्जानिर्मितीतील अधिक भाग हा कोळसा आणि पेट्रोलियम इंधनांवर खर्च होतो. हे इंधन आयात करावे लागत असल्याने देशाची परकीय चलनाची गंगाजळीतील मोठा हिस्सा खर्च करावा लागतो. ही बचत करण्यासाठी सौर ऊर्जा व अपारंपारिक ऊर्जेचे अन्य पर्यायांचा वापर करण्यास चालना देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. त्यास चालना देण्यासाठी नागरिकांनी पर्यायी ऊर्जास्रोतांचा वापर करावा,असे आवाहन अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) आणि ऊर्जा दक्षता ब्युरो (BEE) यांच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रिक वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले. टीव्ही सेंटर मैदानापासून या रॅलीस प्रारंभ झाला. महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक विनोद सिरसाट, अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपवनसंरक्षक प्रमोद लाकरा, महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, महेंद्र ढवले, प्रकाश पेटवडेकर, किशन धोत्रे आदी उपस्थित होते.

श्री. सावे म्हणाले की, ऊर्जेची बचत करणे म्हणजेच ऊर्जेचे उत्पादन करणे होय. मोठ्या प्रमाणावर आपल्या देशाला इंधन आयात करावे लागते. त्यामुळे पर्यायी ऊर्जेचा वापर करुन ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे हे आपल धोरण आहे. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता लोकप्रतिनिधींनाही इलेक्ट्रीक वाहने वापरण्यास सांगितले आहे. अशाप्रकारे आयात इंधन वापरास पर्याय उपलब्ध करुन आपण परकीय चलनाचीही बचत करु शकतो,असे सावे यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की. छत्रपती संभाजीनगर हे क्षेत्र इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीत अग्रेसर आहे. देशातील अग्रगण्य उद्योजक या ठिकाणी इलेक्ट्रीक वाहन निर्मितीचे उद्योग उभारत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

प्रास्ताविक विनोद शिरसाट यांनी केले. श्री. सावे यांच्या हस्ते झेंडी दाखवून रॅली रवाना करण्यात आली. या रॅलीत मोटार सायकल, तीन चाकी रिक्षा, मालवाहू वाहने,हातगाडी, बसेस, कार अशा विविध ३५० हून अधिक ईलेक्ट्रिक वाहनांनी सहभाग घेतला. क्रांती चौकात रॅलीचा समारोप झाला.

०००००

संबंधित पोस्ट

     पंतप्रधान इंटर्नशिप योजना’, लाभ घेण्याचे आवाहन                                        

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील चित्रपटांची घोषणा इफ्फी 2025 मध्ये प्रतिष्ठित ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कारासाठी पंधरा चित्रपट स्पर्धेच्या रिंगणात

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी बीडच्या विकासाला नवी गती; १७ सप्टेंबरला रेल्वेची पुण्याशी तर डिसेंबरमध्ये मुंबईशी जोडणी कालबद्ध आराखडा तयार करून युद्ध पातळीवर काम करण्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभाग-धोकादायक इमारतींविषयी जाहीर आवाहन

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष यांनी घेतला आढावा-मराठा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवा – नरेंद्र अण्णासाहेब पाटील

खरीप पेरणीसाठी घाई करू नका ; 80 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा – तालुका कृषी अधिकारी