vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सैन्यदल अधिकारी पदाच्या परीक्षेसाठी मोफत पूर्वप्रशिक्षण

सैन्यदल अधिकारी पदाच्या परीक्षेसाठी मोफत पूर्वप्रशिक्षण

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमदेवारांसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे मोफत प्रशिक्षणाची सुविधा करण्यात येते. येत्यादि.५ ते १४ मे या कालावधीत याबाबतचे प्रशिक्षण क्रमांक ६१ चे आयोजन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था निः शुल्क करण्यात येते. या संधीचा लाभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे दि.३ मे रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येते वेळी त्यांनी सैनिक कल्याण विभागाच्या www.mhasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन (Other – PCTC Nashik SSB-61) कोर्ससाठी संबंधित या परिशिष्टांची प्रिंट काढून व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन जावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक यंचा ईमेल आयडी – training.petcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. आणि ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाट्सएप क्र. ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

सियाल इंडिया २०२५ मध्ये ‘उमेद’चा डंका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘उमेद’ महिलांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचणार

जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्पांतर्गत इंदोर येथे प्रशिक्षणासह अभ्यास दौरा संपन्न..

डेअरी आणि चीज ॲनालॉगच्या वापराबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

राजर्षी शाहू महाराज सन्मान योजनेसाठी३१ जुलैपर्यत ऑनलाईन अर्ज करावेत

रोहा येथे पंडित दीन दयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी

vishwatmaklokswamivarta