vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्यासाठी शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्याच्या बदल्यात कृषी विद्यापीठाला जिल्ह्यातील अन्य ठिकाणची ६० ते १०० हेक्टर एकत्रित पर्यायी जागा देण्यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक  

कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्यासाठी शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्याच्या बदल्यात कृषी विद्यापीठाला जिल्ह्यातील अन्य ठिकाणची ६० ते १०० हेक्टर एकत्रित पर्यायी जागा देण्यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक

कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्यासाठी शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्याच्या बदल्यात कृषी विद्यापीठाला जिल्ह्यातील अन्य ठिकाणची ६० ते १०० हेक्टर एकत्रित पर्यायी जागा देण्यासंदर्भात आज बैठक पार पडली.

राज्याच्या विकासासाठी कृषी आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांचा समतोल विकास महत्वाचा आहे. शेती संशोधनाच्या क्षेत्रात विद्यापीठांनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना आवश्यक सुविधा तसंच शेती, शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यक्रमासाठी पुरेसी, अनुकुल जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी शासनाची असून शासन ती पार पाडेल. राज्यानं काळाची गरज ओळखून उद्योगस्नेही धोरण स्विकारलं आहे. त्यातून उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात येत आहे. यातून राज्याचा आर्थिक विकास आणि रोजगाराची संधी उपलब्ध करण्याची उद्दिष्टे साध्य होणार आहेत. त्यातूनच कोल्हापूरात आयटीहब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या माध्यमातून युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होणार आहेत.

कृषी विद्यापीठाला कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यातील वीज, पाणी, रस्त्यांच्या सोयीनं युक्त ६० ते १०० हेक्टर एकत्रित शेती योग्य पर्यायी जागा विद्यापाठाच्या अधिकाऱ्यांच्या सहमतीनं उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार त्या जागेचा विकासही करुन देण्यात येईल. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या मान्यतेनं येत्या दहा दिवसांत पर्यायी जागा अंतिम करावी, अशी सूचना केली. त्या जागेच्या हस्तांतरणास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात येईल, असं यावेळी स्पष्ट केले आहे

संबंधित पोस्ट

जनसामान्यप्रेमी आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या नेतृत्वातील जनता दरबारास ‘न भूतो न भविष्यती’ असा प्रतिसाद… 

राज्यस्तरीय खरीप हंगाम 2024-25 पीक स्पर्धेमध्ये ज्वारी, बाजरी व सोयाबीन पिकामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी*

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण तिस-या दिवशीही मोहीम…

vishwatmaklokswamivarta

बेळगावी येथे 19 ऑक्टोबरला माजी सैनिक मेळावा

vishwatmaklokswamivarta

आता फक्त माणसं सुधारण्याची गरज: रावसाहेब दानवेविल्हाडीच्या बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन..

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘चांदा ज्योती सुपर १००’ अभ्यासिकेचे उद्घाटन; जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम