vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 जालना, प्रतिनिधी :- प्रादेशिक हवामानशास्‍त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्‍ह्यात दि. 1 ते 2 एप्रिल 2025 या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्‍या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 50-60 कि.मी.प्र.ता. वेगाने) व गारपीट होण्‍याची तर 3 एप्रिल रोजी यलो अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्‍या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 40-50 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्‍या ते मध्यम स्‍वरुपाच्‍या पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. तसेच दि. 4 एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्‍वरुपाच्‍या पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी वादळी वारे, विजेपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती दक्षता बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गणेश महाडिक यांनी केले आहे.
मेघगर्जनेच्‍या वेळी, विज चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विज चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या तारांपासून दूर रहावे. वीज चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. आपत्कालीन परिस्थितीत जिल्‍हाधिकारी कार्यालयातील जिल्‍हा नियंत्रण कक्ष ०२४८२-२२३१३२ वर तसेच नजीकच्या तहसील कार्यालयात, पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

🔥 पानिपतची तिसरी लढाई (१७६१)

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवक्षेत्र मराडे पाडा, भिवंडी येथे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तिपीठ) परिसरा’चे लोकार्पण केले.

vishwatmaklokswamivarta

कुंभमेळा; जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन जारी,नागरिकांनी संपर्क करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आदिवासी आश्रम शाळांमध्ये 1 फेब्रुवारीपासून नवीन वेळापत्रक लागू होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके*आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सेवासुविधांकरिता भरघोस निधी उपलब्ध केला जाईल

vishwatmaklokswamivarta

जिल्हा विकास आराखड्यांतर्गत धोरणात्मक कामांसाठीजिल्हा वार्षिक योजनेतील 25 टक्के निधी राखीव ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न- सन 2026-27 साठी 676 कोटी 29 लाख रूपये नियतव्यय मंजूर – गत आर्थिक वर्षातील निधी जवळपास 100 टक्के खर्च

राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार