vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्ह्यातील दोन भू-प्रणाम केंद्रांचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्‌घाटन…

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्ह्यातील दोन भू-प्रणाम केंद्रांचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्‌घाटन…

         सांगली, प्रतिनिधी : भूमि अभिलेख विभागांतर्गत सांगली जिल्ह्यात नगर भूमापन अधिकारी कार्यालय, सांगली व उप अधीक्षक भूमि अभिलेख, कडेगाव या ठिकाणी सुसज्ज व अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त भू-प्रणाम केंद्रांचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे आज करण्यात आले. या कार्यक्रमास भू-प्रणाम केंद्रामध्ये जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुरेखा सेठिया, नगर भूमापन अधिकारी सुवर्णा मसणे व जिल्ह्यातील सर्व उप अधीक्षक, कर्मचारी व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जनतेसाठी भूमि अभिलेख विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सेवा भू-प्रणाम केंद्रातून उपलब्ध होणार आहेत. याचा अधिकाधिक जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुरेखा सेठिया यांनी यावेळी केले. नगर भूमापन अधिकारी, सांगली व उप अधीक्षक भूमी अभिलेख कडेगाव येथील भू-प्रणाम केंद्रामध्ये जनतेस / अभ्यागतांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय व प्रतिक्षालय याची सोय करण्यात आली असून त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांसाठी उत्तम दर्जाची सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत.

भू-प्रणाम केंद्रांची संकल्पना,भूमि अभिलेख विभागाची वाटचाल आधुनिकीकरणाकडे होत असून त्याचाच एक भाग म्हणून राज्यात दोन टप्प्यामध्ये एकूण ३० भू-प्रणाम केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख जमाबंदी आयुक्त आणि संचालक डॉ. सुहास दिवसे यांच्या संकल्पनेतून व पुणे विभागाचे भूमि अभिलेख उपसंचालक राजेंद्र गोळे यांच्या मार्गदर्शनातून भू-प्रणाम केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. या केंद्रामध्ये भूमि अभिलेख विभागामार्फत विविध सेवा अंतर्गत संगणकीकृत मिळकत पत्रिका, मिळकत पत्रिकेवरील फेरफार, सर्व प्रकारच्या फेरफारासाठी अर्ज, ई मोजणी व्हर्जन २.० मधील सर्व प्रकारचे मोजणी नकाशे, मिळकतीचे डिजिटल साईन केलेले सर्व प्रकारचे नकाशे इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. EPCIS प्रकल्पांतर्गत फेरफार नोंदवहीचा उतारा, परिशिष्ठ अ, परिशिष्ठ ब, नमुना नंबर ९ ची नोटीस , नमुना नंबर १२ ची नोटीस, अर्जाची पोच, रिजेक्शन पत्र, त्रुटी पत्र, निकाली पत्र, विवादग्रस्त नोंदवही उतारा, सर्व प्रकारच्या अपिल निर्णयाच्या प्रती व इतर संगणकीकृत अभिलेख उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचे दरही निश्चित करण्यात आले असल्याचे नगर भूमापन अधिकारी सुवर्णा मसणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र आणि देशाच्या उभारणीत कामगारांचे मोलाचे योगदा – महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे,महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा मुख्य कार्यक्रम उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

दैनिक सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न ! ‘सनातन प्रभात’ नेहमीच काळाच्या पुढे राहिले आहे ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, शारीरिक क्षमता निर्माण करावी- राज्यपाल हरिभाऊ बागडे* ▪️शिरूर अनंतपाळ येथे प्रभाकर कुलकर्णी गुरुजी यांचा जीवनगौरव सोहळा  ▪️’असा एक प्रभाकर’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालत;३१ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत…

जालना जिल्ह्यासाठी 8 हजार 515 कोटींच्या वार्षिक पत आराखड्याचे प्रकाशन• पीक कर्ज, कृषी व एमएसएमई क्षेत्राला प्राधान्य• वार्षिक पत आराखड्यात बँकांची 101 टक्के उद्दिष्टपूर्ती