vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईकरांना  सतर्क राहण्याचे मुंबई पोलिसांचे आवाहन – शहरात दहशतवादी हल्ल्याची शक्यता; ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त..

मुंबईकरांना  सतर्क राहण्याचे मुंबई पोलिसांचे आवाहन – शहरात दहशतवादी हल्ल्याची शक्यता; ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त..

[ मुंबई प्रतिनिधी:

मुंबईत हायअलर्ट. मुंबई शहरात दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळं एकाएकी तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, पोलीस यंत्रणा सत्रक झाल्या आहेत. शहरात पुढील महिनाभरासाठी ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर आणि हॉट एअर बलून उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी याबाबतचं परिपत्रकच जारी केलं असून, त्यानुसार दहशतवादी किंवा राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर आणि हॉट एअर बलूनचा वापर करुन दहशतवादी हल्ला करण्याची भीती आहे. तसंच शहरातील VVIP व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठी ही कटकारस्थानं रचली जाऊ शकतात. मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जीवन धोक्यात आणू शकतात.

समाजविरोधी घटकांकडून शहरातील गर्दीची ठिकाणं देखील लक्ष्य केली जाऊ शकतात. याच अनुषंगाने पोलिसांनी या सर्व प्रकारच्या ड्रोन वापरावर बंदी घातली आहे. ज्याअंतर्गत कोणत्याही परवानगीविना ड्रोन, रिमोट कंट्रोल ऑपरेटेड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लाइडर वापरला गेल्यास कडक कारवाई केली जाईल, असं मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन…

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असतानाची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळताच पोलीस पहारा वाढवत शहरातील नागरिकांना या वेळी सतर्क राहत पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोणताही अनुचित प्रकार किंवा कोणतीही संशयास्पद कृती दिसल्याच त्याची माहिती पोलिसांना देण्यात यावी असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.

‘मी कसाब बोलतोय’ पोलिसांना आला फोन आणि मग…

एकिकडे शहरात दहशतवादी हल्ल्याचा इशारा जारी करण्यात आलेला असतानाच दुसरीकडे मुंबई पोलिसांनी बुधवारी मुंलुंडमधून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. या व्यक्तीनं मंगळवारी मध्यरात्री 1 वाजता मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन लावत ‘कसाब का भाई बोल रहा हू…’ असं बोलून फोन ठेवला. पोलिसांनी तातडीनं हा फोन ट्रेल केला आणि बुधवारी पियुष शुक्ला, वय 28 वर्षे या इसमाला ताब्यात घेतलं. ठाण्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या या इसमानं मद्यधुंद अवस्थेत पोलिसांना हा फोन केल्याची बाब यानंतर तपासातून उघड झाली. सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस पुढे तपास करत आहे

संबंधित पोस्ट

५४२ मोटार अपघात दावे प्रकरणात ४ कोटी ३० लाखांची,नुकसान भरपाई; पक्षकारांना संपर्क साधण्याचे आवाहन

100 दिवसांच्या कृती आराखडा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत 1.50 लाखाहून अधिक संचिकांचे वर्गीकरण**कार्यालयीन स्वच्छता व सुयोग्य अभिलेख जतन पध्दतीवर भर*

ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र प्राथमिक निवड, मुलाखत, शुध्दिपत्रक, मुलाखत वेळापत्रकाबाबत आवाहन  

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेश स्पर्धापरीक्षा १ मार्च रोजी

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा नगरपरिषद क्षेत्रात ‘नक्शा’ पथदर्शी कार्यक्रम-  आज उद्घाटन होणार

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 34.21 टी.एम.सी. पाणीसाठा

vishwatmaklokswamivarta